अबब.. गुंतवणुकदारांना दोन महिन्यांत तब्बल पाच पट परतावा देण्याचे आमिष दाखवून 54 लाखांना गंडवले ! पिंप्री राजा, सिडको आणि जयभवानीनगरच्या सहा जणांची जमापुंजी पाच जणांच्या टोळीने ओरबाडली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- पिंप्री राजा, सिडको व जयभानीनगरच्या सहा जणांची एकूण 54,28,858 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. १ लाख रुपये गुंतवा आणि दोन महिन्यांत पाच पट म्हणजेत एका लाखाचे पाच लाख रुपये मिळवा असे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर व परिसरातील लोकांना एका टोळीने गंडवले. याप्रकरणी पाच जणांवर MIDC सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा २०० कोटींचा घोटाळा ताजा असतानाच आता हा नवा घोटाळा समोर आल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
1) राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार, रा. प्लॉट नं G 14 नारेगाव, फातेमा मशिद जवळ चिकलठाणा औद्योगीक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर 2 ) शुभम काकासाहेब गावंडे (रा. घर नं 5/17/33ग.नं 1 समता नगर, ह.मु करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर, 3) व अन्य दोन महिलांवर MIDC सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील सलुन व्यावसायीक महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ब्युटी पार्लरमध्ये एक महिला मेकअप साठी गेल्या 6 महिन्यांपासून येत होती. त्या महिलेने फिर्यादी ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेची ओळख 1) राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार 2) शुभम काकासाहेब गावंडे व अन्य एका महिलेसोबत करून दिली. नंतर राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार यांच्या ऑफिसला घेऊन गेल्या. तेथे फिर्यादी ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेला या चारही आरोपींनी सांगितले की तुम्ही जर आमच्याकडे रु.100000/- (एक लाख रुपये) गुंतविले तर आम्ही तुम्हाला दोन महिन्यांमध्ये पाच लाख रुपयांचा परतावा देऊ.
यासंदर्भात त्यांनी कॉम्पुटरवर आजपर्यंत लोकांना एक कोटी, दोन कोटी रुपये परतावा म्हणून दिल्याची कागदपत्रे तसेच बँकेचे धनादेश दाखवले. ही कागदपत्रे दाखवून फिर्यादी ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेचा विश्वास संपादित केला. सदरील स्किममध्ये पैसे लावून तुम्हाला पाचपट परतावा मिळेल असे आमिष दाखवले.
त्यानुसार त्यांच्या अमिषाला बळी पडून फिर्यादी ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेने दिनांक 01/01/2023रोजी रु.100000/- दिनांक (04/01/2023 रोजी रु 200000/- असे एकूण रु.300000/- रोख स्वरुपात आरोपी महिला, राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार, शुभम काकासाहेब गावंडे व अन्य एक आरोपी महिला यांना गुंतवणुक म्हणुन डिपॉझिट दिले. संपूर्ण रोख रक्कम दोन महिन्यामध्ये म्हणजे दि. 04/03/2023 रोजी रुपये 1500000/- गुंतवणुकीचा परतावा म्हणुन देण्याचा विश्वास व हमी आरोपींनी दिली.
तसेच फिर्यादी ब्युटी पार्लर महिले सारखे आकाश अशोक घोरपडे (रा. पिंप्री राजा करमाड ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांना सुद्धा आमिष देवून चौघा आरोपींनी रु. 50,5000/- डिपॉझिट घेतले. तसेच जयभवानीनगर येथील एका महिलेकडून या चौघा आरोपींनी आमिष दाखवून 13,29,051/- डिपॉझिट घेतले. अच्युत गणपत राऊत (रा. सिडको MIDC वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर) आरोपींनी 14,70,000/- डिपॉझिट घेतले.
जयभवानीनगर परिसरातील आणखी एका महिलेकडून 6,00000/ तर सिडकोतील एका महिलेकडून 9,50,000/- डिपॉझिट व सोण्याच्या दागीण्यांचे रु 2,29,807/- गोल्ड लोन चे डिपोझिट करुन घेतले. पैसे गुंतवणूक करणारे हे सर्व जण मागील 2ते 3 महिन्यांपासून आरोपींना विचारपुस करत होते. आज देऊ उद्या देवु असे म्हणून ते टाळाटाळ करीत होते. तसेच राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार, शुभम काकासाहेब गावंडे व आरोपी महिलेस भेटण्याचा प्रयत्न केला असता ते लोक भेटत नव्हते.
त्यामुळे गुंतवणुकदारांच्या लक्षात आले आहे की, 1 ) राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार, रा. प्लॉट नं G 14 नारेगाव, फातेमा मशिद जवळ चिकलठाणा औद्योगीक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर 2 ) शुभम काकासाहेब गावंडे (रा. घर नं 5/17/33ग.नं 1 समता नगर, ह.मु करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर, 3) व अन्य दोन महिलांनी आमिष दाखवून एकूण 54,28,858 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सिडकोतील ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेच्या फिर्यादीवरून MIDC सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe