छत्रपती संभाजीनगर
Trending

आता 24 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना फायर एनओसीची गरज नाही ! आर्किटेक्ट, बिल्डरांवर सोपवली जबाबदारी तर अग्निशमन विभागालाही दिले हे आदेश !!

आर्किटेक्ट आणि बिल्डर यांनी नियमानुसार आपापली जबाबदारी पार पाडावी, प्रशासक

संभाजीनगर लाईव्ह, दि 19 -; महानगरपालिका हद्दीतील 15 मीटर उंची पर्यंतची बिल्डिंग बांधताना फायर एनओसी घ्यावी लागते. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार 24 मीटर पर्यंत उंचीची इमारत बांधकामास फायर एनओसीची गरज नाही. यासंदर्भातील सर्व नियमावली जाणून घेऊन प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता 24 मीटर पर्यंत उंचीची बिल्डिंग बांधताना फायर एनओसीची गरज नाही. अग्निशमन विभागाने त्यांचे आवश्यक ते शुल्क नियमानुसार आकारून ना हरकत बाबत आग्रह धरू नये असे, असे आदेशही प्रशासकांनी दिले.

संबंधित आर्किटेक्ट आणि बिल्डर यांनी नियमानुसार आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देशही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी दिले. आज प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली क्रेडाई आणि आर्किटेकट अँड बिल्डर असोसिएशन यांचे प्रतिनिधी तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी यांची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात संपन्न झाली. सदरील बैठकीत क्रेडाई आर्किटेक्ट अँड बिल्डर असोसिएशन यांनी असा मुद्दा मांडला की महानगरपालिका हद्दीतील 15 मीटर उंची पर्यंतची बिल्डिंग बांधताना फायर एनओसी घ्यावी लागते. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार 24 मीटर पर्यंत उंचीची इमारत बांधकामास फायर एनओसीची गरज नाही, असे नियम आहे. यावर प्रशासकांनी याबाबतचे नियम काय आहे, फायर ऍक्ट मध्ये काय प्रावधान आहे आणि आर्किटेक्ट आणि बिल्डर यांची काय काय जबाबदारी आहे याची माहिती घेतली.

जर या सर्वांची जबाबदारी आर्किटेक्ट आणि बिल्डर यांची असेल तर त्यांनी यु डी सी पी आर नियमावली नुसार काम करावे व अग्निशमन विभागाने त्यांचे आवश्यक ते शुल्क नियमानुसार आकारून ना हरकत बाबत आग्रह धरू नये असे, प्रशासक जी श्रीकांत यांनी आदेशित केले. याशिवाय विकास योजना नकाशात डी पी रोड असलेल्या जागांवर महापालिकेमार्फत मार्किंग करण्यात यावी जेणेकरून कोणीही रस्त्यातील प्लॉटिंग करून विकणार नाही आणि अतिक्रमण देखील करणार नाही अशी मागणी यावेळी संबंधित असोसिएशन्स यांनी केली.

यावर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासकांनी यावेळी दिले. याशिवाय मोठे गृह प्रकल्प करताना ऑनलाइन बांधकाम परवानगी घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे असा मुद्दा उपस्थित केल्यावर, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे यांनी महानगरपालिकेतील टप्पा क्रमांक 03 इमारतीत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम फॅसिलेटेशन सेंटरची मदत घेण्यास सांगितले.

सदरील केंद्र ऑनलाईन परवानगी घेण्यासाठी मार्गदर्शन व कार्यवाही करण्यास उघडण्यात आला आहे. यावर प्रशासक महोदयांनी अशी सूचना केली की क्रेडाई आणि आर्किटेक्ट अँड बिल्डर असोसिएशन यांनी संयुक्त विद्यमानाने असाच एक सेंटर तयार करावा जेणेकरून ऑनलाइन परवानगी घेणारे नागरिकांना फायदा होईल.

सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, रजा खान, विशेष भूसंपादन अधिकारी वी. भा. दहे, उप अभियंता संजय कोंबडे, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, मनोहर सुरे, तसेच क्रेडाईचे अध्यक्ष विकास चौधरी, सचिव सूर्यवंशी व इतर सदस्य आणि आर्किटेक्ट अँड बिल्डर असोसिएशन यांचे सीनियर मेंबर दीपक देशपांडे, भाले, पाटे आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!