छत्रपती संभाजीनगर
Trending

बाबा पेट्रोलपंपावर आरडा ओरड करून होमगार्डच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ चावा घेतला !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – आरडा ओरड करून पंपावरील लोकांना शिवीगाळ करत असताना समजावण्यास गेलेल्या होमगार्डच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ चावा घेतल्याची घटना १८ जून रोजी रात्री २३.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोलपंपावर घडली.

शेख जलील अब्दुल रहेमान (वय ५८, रा. दक्षता नगर पोलिस कॉलनी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी होमगार्डचे नाव आहे. प्रकाश भीमराव दाभाडे (वय २९, रा. गरम पाणी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंप येथे फिर्यादी होमगार्ड शेख जलील अब्दुल रहेमान हे पोलीस अमंलदारसह कर्तव्यावर हजर होते. होमगार्ड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी प्रकाश भीमराव दाभाडे यांनी बाबा पेट्रोलपंप येथे आरडा ओरड करून पेट्रोल पंपावरिल लोकांना शिवीगाळ करत होते.

फिर्यादी होमगार्ड शेख जलील अब्दुल रहेमान यांनी आरोपी प्रकाश भीमराव दाभाडे यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फिर्यादीस सोबत झटापट केली. त्यानंतर फिर्यादी होमगार्ड शेख जलील अब्दुल रहेमान यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ आरोपी प्रकाश भीमराव दाभाडे यांनी तोंडाने चावा घेवून जखम केली. याशिवाय सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी होमगार्ड शेख जलील अब्दुल रहेमान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश भीमराव दाभाडे यांच्यावर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अमोल सोनवणे हे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!