गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी चौक रस्त्यावरील अतिक्रमण हटवले ! कॅनॉट, सिडको, मुकुंदवाडीतही अतिक्रमणावर जेसीबी फिरवला !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.२५ – महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने रिलायन्स मॉल गारखेडा गजानन महाराज मंदिर ते जवाहर नगर पोलिस स्टेशन या वर्दळीच्या रस्त्यावर आज कारवाई करण्यात आली.
महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत आज शहरातील विविध भागांत कारवाई करण्यात आली. यामध्ये गजानन महाराज मंदिर कडून सूतगिरणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिलायन्स मॉलच्या समोरील रस्त्यावर काही किरकोळ स्वरूपाचे विक्री करणारे वाहतूक अडथळा करणारे एकूण चार बाय पाच तीन बाय पाच या स्वरूपातील लोखंडी टपऱ्या हटविण्यात आल्या. या ठिकाणी इतर किरकोळ स्वरूपाचे फळ विक्रीमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत या भागातील नागरिकांनी वाहतूक शाखेच्या पोलिस व मनपाकडे लेखी स्वरुपात तक्रारी केल्या होत्या.
त्या अनुषंगाने या लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना पूर्व सूचना देण्यात आली होती तरी देखील हे लोक रस्त्यावरच अतिक्रमण करून आपला व्यापार करत होते. त्यानुसार आज सकाळी या ठिकाणी कारवाई करण्यात आली व एकूण सहा टपऱ्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर या पथकाने सिडको जीएसटी कार्यालयासमोरील एकूण आठ फळ विक्रेत्यांच्या गाड्या हटवून त्यांचे किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त केले.
सिडको एन ०४ मुकुंदवाडी भागात खुल्या जागेवर या भागातील काही नागरिक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी प्रथमदर्शनी 40 बाय पाच या आकाराची भिंत बांधण्याचे काम सुरू केले होते. त्यानुसार याबाबत सिडको कार्यालय पुंडलिक नगर पोलीस ठाणे एन ४ परिसरातील पोलीस चौकी लगत खुल्या जागेवर हे बांधकाम सुरू होते. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठांच्या परवानगीने सदर भिंत काढून टाकून जागा अतिक्रमण मुक्त केली.
सायंकाळी वाहतूक शाखेचे समवेत कॅनॉट परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये चार चाकी दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त अतिक्रम विभाग प्रमुख सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे, सय्यद जमशीद आणि रवींद्र देसाई सहकारी कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांनी कारवाई केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe