महाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचे भूसंपादन, पूर्णा तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना दीड कोटीवर मावेजा !

पुर्णा तालुक्यातील द्रुतगती महामार्गाचा पाच शेतकऱ्यांना दीड कोटीवर मावेजा वाटप

संभाजीनगर लाईव्ह, दि.२६ -: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचे भूसंपादन झाले असून, गंगाखेड उपविभागांतर्गत येणाऱ्या पूर्णा तालुक्यातील पाच शेतक-यांना १ कोटी ६३ लाख ९९ हजार ५६८ रुपयांचा मावेजा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नांदेड, कार्यकारी अभियंता वनवे, तहसीलदार (पूर्णा) माधव बोथीकर यांच्यासह आशिष राठोड, अमोल खेडकर तसेच एचडीएफसी बँकेचे शेख यावेळी उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणारा द्रुतगती महामार्ग जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातून जात असून, या द्रुतगती महामार्गाचे भूसंपादन झाले आहे.

या महामार्गामध्ये पूर्णा तालुक्यातील चार गावांतील पाच शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले आहे. तालुक्यातील माटेगाव येथील शेतकरी संतोष विठ्ठल बोबडे यांना ८० लाख २१ हजार ५३६ रुपये व लक्ष्मीबाई माणिकराव बोबडे यांना २६ लाख ३९ हजार ७२८ रुपये मावेजाचे वाटप करण्यात आले आहे.

पिंपळगाव लिखा येथील व्यंकटी दत्तराव देसाई यांना ४१ लक्ष १६ हजार ४५३, पिंपरण येथील वामन नेमाजी सोनटक्के यांना १४ लक्ष ५५ हजार २७९ आणि संदलापूर येथील शेतकरी प्रल्हाद शंकरराव चापके यांना १ लाख ६६ हजार ५७२ असे एकूण एक कोटी ६३ लाख ९९ हजार ५६८ रुपयांचा मोबदला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जीवराज डापकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!