महाराष्ट्र
Trending

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा: मराठवाड्यात ११ हजार ५३० नोंदी सापडल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय !

मुंबई, दि. ३० – मराठवाड्यात आतापर्यंत ११ हजार ५३० नोंदी सापडल्या असून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आतापर्यंत १ कोटी ७३ लाख कागदपत्र तपासले आहेत. यातील ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या. ही एक समाधानकारक बाब आहे. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती यासंदर्भातील अहवाल उद्या, ३१ ऑक्टोबर रोजी होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात येईल. त्यानंतर महसूलमंत्री हे संबधीत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिसीवर (ऑनलाईन) बोलून ज्यांच्या जुन्या नोंदी सापडल्या आहेत त्यांची कागदपत्रे तपासून कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे.

दरम्यान, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे. आतापर्यंत जे पुरावे सापडले आहेत ते पुरेसे आहेत त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कोणताही निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी अद्याप घेतलेला नसून अजून वेळ ते मागत आहे. केवळ ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या जाहीर केलं आहे. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हा विषय अजून मार्गी लागलेला नाही.

Back to top button
error: Content is protected !!