महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असून सरकारचे त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण ! आरक्षणासाठी रोज आत्महत्या, समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल

मुंबई, दि. २९ – मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असून सरकारचे त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण सुरु आहे. आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत असून समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय ? असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.

जरांगे-पाटील उपोषण करीत आहेत, पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे.. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!