महावितरणच्या तंत्रज्ञास चप्पल काढून मारली, डीपीचा फ्युज गेल्यावरून राडा ! कॉलर धरून धमकावले, तुला छाटून टाकीन !!
मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या तंत्रज्ञास शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ग्राहकावर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमरुद्दिन बागवान फत्ते मोहंमद असे आरोपीचे नाव आहे.
महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ प्रेमचंद चव्हाण हे दोघे सोमवारी (२७ मे) दुपारी ग्राहकांना वीजबिल थकबाकी वसुलीबाबत फोन करत होते. त्यावेळी आरोपी कमरुद्दिन बागवान फत्ते मोहंमद हा नारेगाव नाला डीपीचा फ्युज गेला असे म्हणत कार्यालयात येऊन शिव्या देऊ लागला.
त्यांची वीज जोडणी नारेगाव नाला डीपीची आहे का? हे तपासण्यासाठी त्यांना चव्हाण यांनी लाईट बिलची प्रत मागितली असता आरोपीने शिवीगाळ केली. तसेच चव्हाण यांची कॉलर धरुन मारहाण केली. चव्हाण यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्यांना आरोपीने चप्पल काढून मारली. तुला छाटुन टाकीन असे म्हणत फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर चव्हाण यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. त्यावरून आरोपी कमरुद्दिन बागवान फत्ते मोहंमदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe