छत्रपती संभाजीनगर
Trending

पाचशे रुपयांच्या उसनवारीवरून दोन रिक्षाचालकांत हाणामारी ! जालन्याच्या रिक्षाचालकावर छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट प्लेसजवळ चाकू हल्ला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – मागील क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकावर चाकुहल्ला केल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कॅनॉट प्लेस, एबीआय बॅंकेजवळ सिडको, छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. पाचशे रुपयांच्या उसनवारीवरून दोन रिक्षाचालकांत ही हाणामारी झाली. याप्रकरणी दोघांनी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश निवृत्ती गव्हाड (वय २०, रिक्षाचालक, रा. कवडगाव, ता. अंबड, जि. जालना, ह. मु. कुंबेफळ, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. विजय दिवटे (रा. रामनगर, मारुती मंदिर जवळ, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे परिचयाचे असून रिक्षाचालक आहेत. यातील फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये मागील किरकोळ वादाच्या कारणावरून वाद होऊन यातील आरोपीने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या कडील चाकुने छातीवर डाव्या बाजूस मारुन गंभीर जखमी केले.

तसेच फिर्यादी व त्याचा भाऊ यांना शिविगाळ करुन मारहाण केली. उपचारा दरम्यानचा फिर्यादीचा जबाब पोह बी.एस. शेवगे यांनी हजर केले वरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी रिक्षाचालक योगेश निवृत्ती गव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय दिवटे यांच्यावर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि वायदंडे हे करीत आहेत.

उसने दिलेले ५०० रुपये मागितले म्हणून मारहाण

उसने दिलेले ५०० रुपये परत मागितले म्हणून मारहाण केल्याची फिर्याद विजय पुंडलिक दिवटे (वय २२, रिक्षाचालक, रा. रामनगर, मारुती मंदिराजवळ, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिली. या फिर्यादीवरून योगेश गव्हाड व दत्ता गव्हाड (दोघे रा. कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादीने आरोपी योगेश गव्हाड यास उसने दिलले पाचशे रुपये परत मागितले. त्याचा राग येऊन दोन्ही आरोपीतांनी फिर्यादीस शिविगाळ करुन योगेश गव्हाड यांनी त्याचे हातातील लोखंडी गजाने फिर्यादीस कपाळावर व डाव्या हाताच्या बोटास मारुन जखमी केले. तसेच आरोपी दत्ता गव्हाड यांनी हाताचापटाने मारहान केली.

Back to top button
error: Content is protected !!