कॅनॉट प्लेस येथील राजगड हॉटेलमध्ये राडा, आर्थिक व्यवहारावरून मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्यास गट्टूने मारहाण !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – पैशांच्या व्यवहारावरून छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस येथील राजगड हॉटेलमध्ये राडा झाला. आरोपींनी फिर्यादीस रस्त्यावरील गट्टू उचलून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 24 रोजी सायंकाळ ७ वाजेच्या सुमारास कॅनॉट प्लेस राजगड टी हाऊस एन ५ सिडको येथे ही घटना घडली.
अभिषेक पप्पू दाभाडे, राहुल दाभाडे, सचिन व एका अनोळखीवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्रविण अर्जुन चव्हाण (वय २३, रा. चिकलठाणा, सावित्रीनगर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे (फिर्यादी) नाव आहे.
यातील फिर्यादी हे त्यांचे मित्र सागर पवार यांच्या सोबत कॅनॉट प्लेस येथील राजगड येथील हॉटेलवर चहा घेत असताना यातील आरोपी हे तेथे आले व फिर्यादी यांच्या मित्रासोबत पैशांच्या व्यव्हारावरून वाद घालून शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण करु लागले. तेव्हा फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी क्रमांक 01 ह्याने रस्त्यावरील पडलेला गट्टु उचलून फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजाव्यावर मारून जखमी केले.
पोलीसांत तक्रार दिली तर तुम्हाला पुन्हा मारहाण करु अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोह शेख करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe