छत्रपती संभाजीनगर
Trending

लग्नात महिलांना लोटलाटवरून वादाचा भडका, जखमीला घाटीतून डिस्जार्ज मिळताच वाटेत पाळत ठेवून मारहाण !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – लग्नात महिलांना झालेल्या लोटलाटवरून वाद पेटला. मारहाणीचा प्रकारही झाला. त्यानंतर जखमीला घाटीत दाखल करण्यात आले. प्रकरण येथेच थांबले नाही तर जखमीला घाटीतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घाटीरोडवर पाळत ठेऊन जखमीसह त्याच्या नातेवाईकांना पुन्हा मारहाण झाल्याची घडना घाटीरोडवर घडली.

निसार खान, वलीयत खान, आवेज खान, समीर (रा. सर्व लोटा कारंजा) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

सालमबिन अब्दुल अजीज बाशवान (वय 42 वर्षे, धंदा-पान टपरी रा. लोटा कारंजा, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि.20/03/2023 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास सरसैय्यद हाँल लोटा कारंजा येथे लग्नामध्ये महिलाना झालेल्या लोटलाटीच्या कारणावरुन सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांचे चुलत भाऊ वाजेद बाशवान, सोहेल बाशवान यांच्यात व लोटलाट करणाऱ्या मुलामध्ये वाद झाला होता. त्यात सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांच्या चुलत भावांना देखिल मार लागला होता म्हणून त्यांना घाटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.

घाटीत दाखल झाल्याची माहिती मिळताच दि. 21/03/2023 रात्री 01.00 वाजेच्या सुमारास सालमबिन अब्दुल अजीज बाशवान हे घाटीत गेले. त्यांना घाटीतून घरी घेवून येत असताना सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांच्या चुलत भावासोबत वाद झाल्याच्या कारणावरून 1)निसार खान, 2) वलीयत खान, 3) आवेज खान, 4) समीर (रा. सर्व लोटा कारंजा) हे घाटी जुब्लीपार्क कडे जाणाऱ्या रोडवर ऊभे होते.

निसार खान व वलीयत खान यांनी शिवीगाळ करून काठ्यांनी तसेच आवेद खान व समीर यांनी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांच्यासह चौघांना मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. त्यात सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांच्या नाकाला व डोक्याला किरकोळ मार लागून जखम झाली. फिरोज खान यांना डोक्याला व नाकाला मार लागल्याने त्यांच्यावर घाटीत उपचार सुरु आहे. सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांचे चुलत भाऊ अब्दुल बाशेद यांना हाताला व नासेरला पाठीत मार लागलेला आहे.

याप्रकरणी सालमबिन अब्दुल अजीज बाशवान यांनी दिलेल्या तक्रारीवरून निसार खान, वलीयत खान, आवेज खान, समीर (रा. सर्व लोटा कारंजा)  या चौघांवर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!