छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहाच्या रेक्टरची नियुक्ती, चीफ रेक्टरपदी डॉ.सतीश दांडगे !

छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १५ विद्यार्थी वसतिगृहाच्या रेक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ’चीफ रेक्टर’ म्हणून लोकप्रशासन विभागातील प्रा.सतीश दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुलांचे आठ तर मुलींची सात वसतीगृहे आहेत.

कुलगुरु डॉ.विजय पुâलारी यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विविध विभागातील प्राध्यापकांची नवीन ’रेक्टर’ची नियुक्ती केली आहे. तसेच वसतीगृहांच्या सर्व रेक्टरवर वॉडर्न यांच्यासह देखरेख करण्यासाठी चिफ रेक्टर म्हणून लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ.सतीश दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त रेक्टर व वसतीगृहांची नावे पुढीलप्रमाणे

डॉ.सतीश भुसारी – छत्रपती शिवाजी महाराज वसतीगृह व्रंâमाक एक, डॉ.सुनील निंभोरे – सिध्दार्थ संशोधन छात्र मुलांचे वसतिगृह क्र.२, डॉ.चंद्रकांत कोकाटे – कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतीगृह क्र.३, डॉ.मदन सूर्यवंशी – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मुलांचे वसतीगृह क्र.४, डॉ.अमोल खंडागळे – शहीद भगतसिंग मुलांचे वसतिगृह क्र.५, डॉ.प्रभाकर उंद्रे- विद्यार्थी वसतिगृह, डॉ.सुचिता यंबल – आंतर राष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, डॉ.सुहास पाठक – मुलांचे वसतिगृह क्र.६ नविन, डॉ.सविता बहिरट – क्रांतीज्योती सावित्रीबाई पुâले विद्यार्थीनी वसतिगृह क्र.१, डॉ.गीतांजली बोराडे – मातोश्री जिजाऊ विद्यार्थीनी वसतिगृह क्र.२,

डॉ.कावेरी लाड – पीएच.डी.विद्यार्थिनी वसतिगृह क्र.३, डॉ.निर्मला जाधव – प्रियदर्शिनी विद्यार्थिनी वसतिगृह, डॉ.प्रवीणा पवार – नायलेट, डॉ.योगिता पद्ये – रमाबाई आंबेडकर अल्पसंख्यांक विद्यार्थि वसतिगृह, डॉ.गौरी कल्लावार – स्व.यशवंतराव चव्हाण मुलींचे वसतिगृह आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.वैâलास अंभुरे व विभागातील सर्व कर्मचारी, विविध वसतिगृहाचे वार्डन या रेक्टरला सहकार्य करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख डॉ.वैâलास पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसतिगृहांना सुरक्षा कर्मचारी देण्यात आले आहेत.
सोबत यादी जोडली आहे.

Back to top button
error: Content is protected !!