छत्रपती संभाजीनगर
Trending

यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम, प्रभावी अंमलबजावणीसाठी कुलगुरुंनी घेतला छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील सर्व ५५ विभागप्रमुखांचा वर्ग !

यंदा पासून पदव्युत्तर विभागात अभ्यासक्रम, नवीन शैक्षणिक धोरण विषयी विभागप्रमुखांशी संवाद

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ -: केंद्रशासन व राज्यशासनाच्या निर्देशाप्रमाणे व पदव्युत्तर विभागात यंदापासून नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रमांची रचना करण्यात येईल. प्रभावीपणे या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घोषित केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांची नवीन शैक्षणिक वर्षातील पहिलीच बैठक शनिवारी (दि.१७) झाली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात आयोजित या बैठकीस मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातील सर्व ५५ विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात कुलपती रमेशजी बैस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम सुरु केले आहे. गेल्या आठवडयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेण्यात आली. या बैठकीतील निर्णयानूसार चालू शैक्षणिक वर्षात केवळ विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागात नव्या अभ्यासक्रम राबविण्यात येईल.

तसेच विद्यापीठाचे घनसावंगी येथील मॉडेल कॉलेज व एमआयटी स्वायत्त महाविद्यालयात पदवी स्तरावर ही हा अभ्यासक्रम अंमलतात येईल. तसेच विद्यापीठातील काही विभागात इंटरग्रेटेड पदवी अभ्यासक्रम राबविण्याचाही प्रयत्न सुरु आहे. सर्व विभागातील विद्यार्थ्यांकडेच ’अकॅडमिक बँक ऑफ केडिट’ अर्थात ’एबीसी’ तात्काळ अपलोड करावे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. प्रारंभी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीतील निर्णय व आपल्या विद्यापीठाने केलेल्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. डॉ.प्रशांत अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विभागप्रमुखांनी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी बाबत आपली मते मांडली.

’रोड मॉडेल’ म्हणून काम : कुलगुरु
राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीरत आपले विद्यापीठ ’रोल मॉडेल’ म्हणून काम करीत आहे. याची जाणीव ठेऊन विभागप्रमुख व प्राध्यापकांनी उत्तमरितीने काम करावे, अशी अपेक्षाही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!