डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करूनच होणार !

- विद्यापीठांतील विविध शैक्षणिक / प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेतील अनुपस्थितीबाबत निर्दशनास आणून दिलेले आहे.
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – नववर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करून होणार आहे. यासंदर्भात कुलसचिवांनी नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकाद्वारे सर्व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करून बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीवरच त्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदवावी असे कळवण्यात आले होते.
तथापि विद्यापीठांतील विविध शैक्षणिक / प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेतील अनुपस्थितीबाबत निर्दशनास आणून दिलेले आहे. कुलसचिवांनी विविध विभागाच्या हजेरीपत्रकाची तपासणी केली असता बरेच कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले आहे.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
त्यानुषंगाने कुलगुरुंनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांची कार्यालयीन उपस्थिती नियमितपणे बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीवरच नोंदवावी. दिनांक ०१-०१-२०२३ पासून विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करण्यात येणार आहे. करिता सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
सर्व शैक्षणिक / प्रशासकीय विभागप्रमुखांनी सदर परिपत्रक आपल्या अधिनस्थ शिक्षकेतर कर्मचान्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.