महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.६  :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (MPSC) 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाच्या परीक्षांची तारीख पुढीलप्रमाणे राहणार आहे:

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा – 2024 – 17 मार्च 2024

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा – 2024 – 27 जुलै 2024

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 – 16 जुन 2024

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2024 – 29 सप्टेंबर 2024

सहायक मोटार वाहन निरिक्षक मुख्य परीक्षा – 2024 – 26 ऑक्टोबर 2024

महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा – 2024 – 17 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा – 2024- 28 एप्रिल 2024

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2024 – 9 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 – 10 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परिक्षा 2024 – 10 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2024 – 23 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 – 23 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 – 23 नाव्हेंबर 2024

निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2024 – 1 डिसेंबर 2024

राज्य सेवा मुख्य परीक्षा -2024- 14 डिसेंबर 2024 ते 16 डिसेंबर 2024

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024 – 28,29, 30 व 31 डिसेंबर 2024

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेत मागणीपत्र प्राप्‍त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये पदेविज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

वेळापत्रक अंदजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना, दिनांकामध्ये कोणत्याही प्रकाराचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्यायावत माहिती Updates वेळावेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळावेळी अद्ययावत करण्यात येईल.

संबधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग दे. वि. तायडे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!