छत्रपती संभाजीनगर
Trending

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून एकाच घरावर दोन वेळा घेतले कर्ज, ग्रामपंचायतीने मिळकत क्रमांक बदलल्याने झाली गफलत ! गंगापूर तालुक्यातील दोघांवर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून एकाच घरावर दोन वेळा कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय महिंद्रा फायनान्सचेही कर्ज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने मिळकत क्रमांक बदलल्याची माहिती अंधारात ठेवून महाराष्ट्र बॅंकेची फसवणूक झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक कामगार चौक, शाखा मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर या शाखेत हा प्रकार समोर आला आहे. शिवाजी लक्ष्मण गवाले (वय ५०, रा. साई सार्थकनगर, राजणगाव शे.पु., ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) व अन्य एक महिला अशी आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपींनी त्यांची मिळकत मालमत्ता क्र9574 हे घर बांधकामासाठी सन 2013 मध्ये महाराष्ट्र बँकेकडुन कर्ज घेतले. त्याबद्दल बँकेला सदर घर गहाणखत म्हणून रजिस्ट्री करून दिले. सदर मिळकतीचा मालमत्ता क्र.9574 ऐवजी 8852 असा ग्रामपंचायतीकडून बदल करण्यात आल्यानंतर आरोपीने सदरचे घर 2019 मध्ये गजानन वानखेडे यांना रजिस्ट्री करून विक्री केले.

आरोपींनी सदर घराचा मिळकत क्रमांक बदल झाल्यामुळे संगणमत करून सन 2021 मध्ये महाराष्ट्र बँकेकडून पुन्हा त्याच घरावरती वाढीव सहा लाख रुपये कर्ज घेऊन बँकेला सन 2021 मध्ये नवीन मिळकती क्रमांकानुसार रजिस्टर गहाणखत करून दिले. आँगस्ट 2022मधे महाराष्ट्र बँकेला समजले की, आरोपींनी रजिस्ट्री करून दिलेल्या मिळकतीच्या क्रमांकावर महिंद्रा फायनान्स बँकेचे सुध्दा कर्ज आहे.

यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनी माहीती घेतली असता आरोपींनी सदर घर 2019 मध्ये विक्री केल्यानंतर बँकेला कोणतीही माहिती न देता सन 2021 मध्ये पुन्हा बँकेकडून विक्री केलेल्या घरावर सहा लाख रुपये वाढीव कर्ज घेऊन ते न फेडता बँकेची 6,87,098 रुपये फसवणूक केली. बँक मॅनेजर यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रार अर्जानुसार चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवून त्यांनी परवानगी दिल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

याप्रकरणी 457/2023 कलम- 420, 465, 467, 468, 471,34 नुसार पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये शिवाजी लक्ष्मण गवाले (वय ५०, रा. साई सार्थकनगर, राजणगाव शे.पु., ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनी काळे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!