छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

वडगाव कोल्हाटीतील १९ जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल ! महावितरणच्या धडक मोहीमेमुळे आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांना हायव्होल्टेज शॉक !!

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथे मे महिन्यात महावितरणच्या धडक मोहिमेत गावातील अनेक ठिकाणी लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून चोरी केल्याचे प्रकार उघड झाले होते. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता गोविंद दुसंगे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

विशाल अप्पासाहेब उभेदळे याने ११९६६ रुपये, प्रवीण युवराज सपकाळ याने ११७०६ रुपये, पांडुरंग सूर्यभान वाघ याने ९६९६रुपये, विजय सांडू प्रधान याने ११२९५ रुपये, विजय सुखदेव घुगे याने १०८८६ रुपये, बंडू कोंडीराम खरात याने ११२९५ रुपये, मंगलबाई जयसिंग सोनवणे हिने १०८८६ रुपये, विजय छबूराव शेलार याने ११५४२ रुपये, एकनाथ धोंडीराम गायकवाड याने १२२६७ रुपये,

सचिन अशोक भोकरे याने १३४५७ रुपये, विठ्ठल मांगू पवार याने ११२९५ रुपये, रमेश पीतांबर निरपगार याने ११७०६ रुपये, योगेश भाऊसाहेब दंडे याने १००७८ रुपये, परमेश्वर विश्वनाथ पंडित याने ११८७० रुपये, वाल्मीक दामू चाकुर याने ११७०६ रुपये, वनिता किशोर अहेर हिने १२०३४ रुपये, सुभाष प्रभाकर पूड याने १०३५२ रुपये, नागनाथ माधवराव गोरे याने १०४२१ रुपये आणि पांडुरंग किसान घुले याने १२७८६ रुपयांची वीजचोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!