छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

बहिणीला कस काय ओळखतो म्हणून चाकू खुपसला, रात्री १२ वाजेची घटना !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – बहिणीला कस काय ओळखतो म्हणून चाकूने मारहाण केली. ही घटना दि.27/07/2024 रोजी रात्री 12.10 वाजेच्या सुमारास इच्छामणी हॉटेल जवळ घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

निलेश चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. दि. 27/07/2024 रोजी रात्री 12.10 वाजेच्या सुमारास इच्छामणी हॉटेलजवळ फिर्यादी व त्याचा मित्र गाडीवर जात असताना निलेश चव्हाण याने फिर्यादीची गाडी थांबवून बहिणीला कसकाय ओळखतो असे म्हणून फिर्यादीवर संशय घेवून त्याच्या जवळ असलेल्या चाकूने फिर्यादीच्या दोन्ही मांडीच्या पाठीमागिल बाजुस मारले. व म्हणाला की पोलिस स्टेशला तक्रार केली तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह मानकर हे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!