महाराष्ट्र
Trending

बदनापूर तालुक्यात पिकअप गाडीजवळ फटाके फोडण्यावरून मारहाण ! दगड डोक्यात घातला, तिघे जखमी, कुसळी गावातील घटना !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – घरासमोर उभ्या असलेल्या पिकअप गाडीसमोर फटाके फोडू नका असे म्हणाल्याने वाद झाला व वादाचे रुपांतर भांडणात झाले. चौघांनी मिळून तिघांवर हल्ला चढवला. यात बाप लेकासह अन्य एक जण जखमी झाला. ही घटना बदनापूर तालुक्यातील कुसळे गावात घडली.

अंकुश विष्णु काटे (वय 39 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. कुसळी ता. बदनापूर जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथ माहिती अहवालानुसार, त्यांच्याकडे एक पिकअप लोडिंग गाडी असून ते ती भाड्याने चालवतात. दिनांक-12/11/2023 रोजी दीपावली असल्याने अंकुश काटे घरीच थांबले होते. पिकअप लोडिंग गाडी त्यांनी त्यांच्या घरासमोर उभा केली होती. रात्री 08.00 वाजेच्या सुमारास गावातील दोघे जण गाडी उभा केलेल्या ठिकाणी फटाके फोडत होते.

तेव्हा अंकुश काटे यांचे वडील विष्णू काशीनाथ काटे हे त्यांना गाडीजवळ फटाके फोडु नका असे समजावून सांगण्यास गेले. त्यांनी वडीलास शिवीगाळ सुरु केली. तेव्हा अंकुश काटे हे त्यांना समजावून सांगण्यास गेले असता तिघांनी मिळून अंकुश काटे व त्यांच्या वडीलांना चापटाबुक्यांनी मारहाण करून धमक्या दिल्या. त्यानंतर अंकुश काटे व त्यांचे वडील दोघेजण पोलीस ठाणे बदनापूर येथे तक्रार देण्यासाठी जात होते तेव्हा चुलत भाऊ जगनाथ लक्ष्मण काटे यास गावातील एकाने दगड डोक्यात मारला. यात ते जखमी झाले.

अंकुश काटे व त्यांचे वडील विष्णु काशीनाथ काटे व चुलत भाऊ जगनाथ लक्ष्मण काटे यांना मारहाण झालेली असल्याने त्यांना पोलीस ठाणे बदनापूर येथील पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्र देवून ग्रामीण रुग्नालय बदनापूर येथे उपचार कामी पाठवले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जगन्नाथ काटे यांना सामान्य रुग्णालय जालना येथे रेफर केले.

याप्रकरणी अंकुश काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये 1) हरी भीमराव वैद्य 2) डिगांबर हरी वैद्य (3) संदीप बबन वैद्य 4) दत्तु हरीभाऊ वैद्य (सर्व रा. कुसळी ता. बदनापूर) यांच्याविरोधात बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!