छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

चौथ्या मजल्यावरील रुम पडून शेजाऱ्याच्या घरावर पडली ! छत्रपती संभाजीनगरातील १५ वर्षाचा मुलगा जखमी !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ८- चौथ्या मजल्यावरील रुम पडून शेजाऱ्याच्या घरावर पडली. यात १५ वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील शंभुनगर परिसरातील रॉयल किराणा दुकानासमोर घडली.

शेख मेहताब शेख मासुम (रा- रॉयल किराणा दुकानासमोर शंभुनगर, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात जफर खान फजरु रहेमान खान (वय 48, रा- रॉयल किराणा दुकानासमोर शंभुनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यातील फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहतात. आरोपी यांचे घराचे अचानक हवा व पाऊस आल्याने चौथ्या मजल्यावर बेकायदेशीर व निष्काळजीपणाने बांधलेली रुम पडली.

विटा, दगड, रेती फिर्यादिच्या घरावर पडल्याने मुलगा अबुझर जफर खान (वय 15 वर्षे) यास डोक्याच्या वर व पाठीमागून मार लागला. यात रक्तस्त्राव झाला व फिर्यादीचे घरीतील पलंग, फरशी व घरगुती सामानाचे नुकसान झाले. यातील आरोपी शेख मेहताब शेख मासुम हा फिर्यादिच्या मुलाला मार लागण्यास व सामानाचे नुकसान करण्यास कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी जफर खान फजरु रहेमान खान (वय 48, रा- रॉयल किराणा दुकानासमोर शंभुनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मेहताब शेख मासुम (रा- रॉयल किराणा दुकानासमोर शंभुनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये गुरनं- 155/2024 कलम 338,427 नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोह वाघमारे करीत आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!