महाराष्ट्र
Trending

सेलू ढेंगळी पिंपळगाव मानवात रोड दरम्यान पाच तासांचा लाईन ब्लॉक, चार मार्चला काही गाड्या उशिरा धावणारा !

नांदेड, दि. २ – सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरीचे कार्य करण्याकरिता दिनांक 4 मार्च रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.

1. गाडी क्रमांक 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान 135 मिनिटे उशिरा धावेल.

2. गाडी क्रमांक 12788 नगरसोल ते नरसापूर एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल.

3. गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस पूर्णा ते मानवाथ रोड दरम्यान 50 मिनिटे उशिरा धावेल.

4. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस मुदखेड ते मानवाथ रोड दरम्यान १९०  मिनिटे उशिरा धावेल.

5. दिनांक 5 मार्च ला धर्माबाद येथून सुटणारी गाडी क्रमांक 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.

Back to top button
error: Content is protected !!