महाराष्ट्र
Trending

तलाठी लाचेच्या सापळ्यात अलगद अडकला, शेतजमिनीच्या खातेफोडची नोंद घेण्यासाठी दहा हजार घेतले !

धाराशिव, दि. २ – तलाठी लाचेच्या सापळ्यात अलगद अडकला. शेतजमिनीच्या खातेफोडची नोंद घेण्यासाठी तलाठ्याने पंचासमक्ष दहा हजार रुपये घेतले.

रविंद्र दत्तात्रय अंदाने (वय 55 वर्षे, पद :- तलाठी, सज्जा :- सावरगाव अतिरिक्त कार्यभार – केमवाडी सज्जा, ता. तुळजापूर जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या मालकीच्या शेतजमिनीची संमतीपत्रा प्रमाणे पत्नी व मुलाच्या नावे फेर फारला (खातेफोड) नोंद घेण्यासाठी प्रथम 15,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/- रुपये लाच स्वीकारण्यास संमती देऊन 10,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, सापळा अधिकारी :- प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक, सापळा पथक – पो.अंमलदार दिनकर उगलमुगले, शेख, विष्णू बेळे, झाकीर काझी यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!