महाराष्ट्र
Trending

सिकंदराबाद ते रक्सोल नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे जनसाधारण विशेष गाडीच्या चार फेऱ्या !

नांदेड, दि. ११- सिकंदराबाद ते रक्सोल नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे जनसाधारण विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्यात आल्या आहेत. दिवाळी आणि छट सणानिमित्त दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद –रक्सोल दरम्यान विशेष गाड्या चालवीत आहे. या गाड्या निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, प्रयागराज चौकी, बक्सर, मुझफ्फरपुर मार्गे धावतील.

1. गाडी क्रमांक 07001 सिकंदराबाद ते रक्सोल – ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 12 आणि 19 नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी 10.30 वाजता सुटेल निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, प्रयागराज चौकी, बक्सर, मुझफ्फरपुर मार्गे रक्सोल येथे मंगल्वारी सकाळी 06.00 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 07002 रक्सोल ते सिकंदराबाद – ही विशेष गाडी रक्सोल येथून दिनांक 14 आणि 21 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी 19.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे गुरुवारी दुपारी 14.30 वाजता पोहोचेल.

3. ही जनसाधारण विशेष गाडी आहे. या गाडीत 22 जनरल डब्बे असतील.

Back to top button
error: Content is protected !!