महाराष्ट्र
Trending

नांदेड पनवेल नांदेड दिवाळी विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या ! वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल एकूण 20 डब्बे !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने नांदेड ते पनवेल दरम्यान दिवाळी विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे.

01. नांदेड-पनवेल विशेष गाडी : गाडी क्रमांक 07615 नांदेड ते पनवेल विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 10 आणि 17 नोव्हेंबर, 2023 ला रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नगरसोल, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 12.20 वाजता पोहोचेल.

02. पनवेल-नांदेड विशेष गाडी : गाडी क्रमांक 07616 पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल येथून दिनांक 11 आणि 18 नोव्हेंबर, 2023 ला दुपारी 13.20 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 04.00 वाजता पोहोचेल.

या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे एकूण 20 डब्बे असतील.

Back to top button
error: Content is protected !!