महाराष्ट्र
Trending

माजलगाव तालुक्यात आजीचा निर्घृण खून ! एकादशीला भाकर मागितली साबुदाना दिला म्हणून लाकडाने ठार मारले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- नातवाने भाकर मागितली. यावर एकादशी असल्याने आजी म्हणाली तू आज शाबुदाना खा. या क्षुल्लक कारणावरून नातवाने आजीचा निर्घृण खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील लोणगांव येथे घडली. लाकडाने आजीचा खून केल्याचे आरोपी मुलाचे वडील तथा मृत वद्धेच्या मुलाने फिर्यादीत म्हटले आहे.

कौशल्याबाई किसन राऊत (वय 80 रा. लोणगांव ता. माजलगाव जि.बीड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. राहुल बालासाहेब राऊत (वय 28 वर्षे, रा. लोणगांव, ता. माजलगाव, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी बालासाहेब किसनराव राऊत (वय 56 वर्षे व्यवसाय शेती रा. लोणगांव ता. माजलगाव जि.बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, बालासाहेब राऊत व त्यांची आई कौशल्याबाई व लहान मुलगा राहुल एकत्र राहत होते. राहुल हा लहानपणापासून रागीट व आळशी आहे. कौशल्याबाई या राहुल व बालासाहेब राऊत यांना स्वयपाक करून देत असे. कौशल्याबाई, बालासाहेब व राहुल हे तिघेजन राहत होते.

दिनांक 23/11/2023 रोजी सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास कौशल्याबाई यांना एकादशीचा उपवास होता म्हणून त्यांनी शाबुदाना केला होता. शाबुदाना खावून बालासाहेब हे 09.15 वाजेच्या सुमारास घराबाहेर निघून गेले. कौशल्याबाई व राहुल हे दोघे घरीच होते. दुपारी 15.00 वाजेच्या सुमारास यांना फोन आला व कळाले की, कौशल्याबाई यांना राहुल हा मारत आहे. ही माहिती मिळताच बालासाहेब तातडीने घरी पोहोचले.

त्यांनी घरामध्ये जावून पाहिले असता राहुलच्या हातामध्ये लाकडाचा तुकडा होता. कौशल्याबाई या तोंडावार, डोक्यावर रक्ताने माखलेल्या अवस्थेत खाली जमीनीवर पडल्या होत्या. बालासाहेब यांनी राहुल यास विचारले की, तू का मारले ? तेव्हा राहुल हा म्हणाला की, मी भाकर करण्यास सांगितले होते पण त्या म्हणाल्या की आज एकादशी आहे. तू शाबुदाना खा. मला भाकर बनवून दिली नाही म्हणुन मी मारले असे म्हणून राहूल तेथून पळून गेला. कौशल्याबाई यांचा यात मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच गावातील लोक जमा झाले. त्यानंतर पोलिस आले व पंचनामा केला.

Back to top button
error: Content is protected !!