छत्रपती संभाजीनगर
Trending

SBIचे ATM हातोड्याने फोडले, जटवाडा रोड सहारा वैभवमधील घटना ! मुंबईच्या कंट्रोल रुममधून सूत्रे हलली अन् छत्रपती संभाजीनगरात ATM फोडणारा पकडला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- अज्ञात व्यक्ती हातोड्याने ATM फोडत असल्याचे SBIच्या मुंबईच्या कंट्रोलरुममध्ये दिसताच त्यांनी सूत्रे हलवली. मुंबईतून छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस कंट्रोलरुमला माहिती मिळताच बेगमपुरा आणि हर्सूल पोलिस स्टेशनचे पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला त्या ATM चे शटर बंद केले. त्यानंतर सापळा रचून ATM फोडणार्या व्यक्तीस रंगेहात पकडले. सदर व्यक्तीने ATM चे मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले. ATM पैशाची चोरी झाली नसली तरी पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सदर व्यक्तीवर दाखल करण्यात आला आहे. ही घटना जटवाडा रोड सहारा वैभव, छत्रपती संभाजीनगर शहरात घडली.

इद्रीस युसुफ पठाण (वय 34 वर्षे रा. रसुलपुरा जटवाडा गाव, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. अभिजीत सतीष निकुंभ (धंदा. खा. नौकरी, रा. काबरानगर, सुतगिरणी गारखेडा परिसर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सहा वर्षांपासून EPS कंपनी मुंबई यांनी नेमणुक केलेली आहे व ते SBI बँकेचे ATM चे देखरेखीचे काम पाहतात. अभिजीत निकुंभ यांच्याकडे SBI बँक व इतर बँकेच्या ATM ची देखरेखीचे काम आहे. त्यापैकी SBI चे एक ATM हे जटवाडा रोड सहारा वैभव छत्रपती संभाजीनगर येथे आहे. दि. 21/11/2023 रोजी ATM मध्ये अंदाजे दुपारी 4.00 वाजेच्या सुमारास पैसे टाकून लोडींग केले होते.

दि.23//11/2023 रोजी 04.14 वाजेच्या सुमारास मुंबई येथुन SBI कमांड सेन्टरचा फोन आला व त्यांनी कळविले की, एक अज्ञात व्यक्ती जटवाडा रोड सहारा वैभव छत्रपती संभाजीनगर येथे ATM फोडण्याचा प्रयत्न करीत आहे व त्याच्या हातामध्ये एक रॉड आहे. यानंतर लगेच कंमान्ड सेंन्टर मुंबई यांनी पोलिस कंट्रोल रुम छत्रपती संभाजीनगर येथे ही माहिती दिली. त्यावरून इलेक्ट्रिशियन व बेगमपुरा पोलिस आणि हर्सूल पोलिस स्टेशनचे पोलिस व्हॅन सह पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी व इलेक्टिशियनने शटर डाऊन करून शटरला लॉक केले. त्यांनतर त्या ठिकाणी बेगमपुरा स्टेशनचे पोउपनि हिवराळे व स्टॉफ, हर्सूल पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ सर्वानी मिळून सेटर उघडून ATM मध्ये प्रवेश केला व त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ अंदाजे अडीच फुट लोखंडी रॉड, लोखंडी वाकस, लोखंडी हातोडा, लोखंडी विळा व दोरी असे मिळून आले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव इद्रीस युसुफ पठाण (वय 34 वर्षे रा. रसुलपुरा जटवाडा गाव, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

ATM चे ब्युटी डोअर, सेप डोर दरवाजा, डायल पॅड, प्रेझेन्टर अशा पार्टची तोडफोड करण्यात आली होती. अधिक पाहणी केली असता ATM मधून सदर चोरट्याने पैसे काढलेले नाही किंवा निघाले नाही. त्या चोरट्याने चोरी करण्याच्या इराद्याने ATM लोखंडी रॉडच्या सहाय्याने व हातोड्याच्या सहाय्याने ATM ची तोडफोड करून नुकसान केले. ATM मधुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न त्याने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अभिजीत सतीष निकुंभ (धंदा. खा. नौकरी, रा. काबरानगर, सुतगिरणी गारखेडा परिसर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून इद्रीस युसुफ पठाण (वय 34 वर्षे रा. रसुलपुरा जटवाडा गाव, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह जाधव करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!