छत्रपती संभाजीनगर
Trending

करोडी लासूर रोडवर दौलताबाद पोलिसांनी गुटखा पकडला ! गंगापूर तालुक्यातील रांजनगांवमधून उचलला होता बंदी असलेला माल !!

धुळे सोलापूर हायवेच्या अंडरब्रीज जवळ असलेल्या सर्व्हीस रोडच्या बाजुला अलगत अडकला सापळ्यात

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ –  दौलताबाद पोलीसाकडून गुटखा व्यापा-यावर कारवाई करण्यात आली. एकूण ५३,५६५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संजय परसराम जाधव (वय ४३ वर्षे रा. करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश काकडे (रा. सावता मंदिरा जवळ रांजनगांव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून त्याने माल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस ठाणे दौलताबाद हद्दीत अवैध धंद्याची माहीती काढून त्यावर कार्यवाही करण्सासाठी पोनि व्हि.एम. सलगरकर यांच्या आदेशाने सपोनि संजय गिते, पोउपनि आयुब पठाण, पोअं सुनील घुसिंगे, पोअं बंडु गोरे, होमगार्ड रंगनाथ परकाळे हे आज दि. २२/०३/२०२३ रोजी सकाळी पेट्रोलींग करीत होते. त्याचवेळी त्यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, करोडी गावाकडून लासुर रोडकडे जाण्यासाठी एक जण बंदी असलेला गोवा गुटखा राजनिवास, सुगंधीत पान मसाला हा माल चोरटी विक्री करण्याकरीता मोटार सायकलवर घेवून जात आहे.

ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने धुळे सोलापूर हायवेवरील करोडी शिवारातील लासुरकडे जाणारे रोडवरील धुळे सोलापूर हायवेच्या अंडरब्रीज जवळ असलेल्या सर्व्हीस रोडच्या बाजुला सापळा रचला. ०९.४० वाजेच्या सुमारास करोडी गावाकडून सर्व्हिस रोडने एक जण बजाज कंपनीची प्लॅटीना १०० CC मोटार सायकलवर (क्र MH- २० FB-६८९४) एक पांढ-या रंगाचे पोते घेवून येत असताना मिळून आला.

त्यास त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संजय परसराम जाधव (वय ४३ वर्षे रा. करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्या जवळ महाराष्ट्र शासनाने व अन्न प्रशासन आयुक्त यांनी प्रतिबंधीत केलेला विक्री बंदीचा आदेश असताना लोकांच्या जीवितास धोका पोहोचवणारे विषारी पदार्थ असलेला राजनिवास सुगंधीत पान मसाला, एक्स एल ०१ जाफराणी जर्दा, हिरा पान मसाला, रॉयल ७१७ तंबाखु गोवा १०००, विमल पान मसाला, विमल वी ०१ तंबाखु यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसाकलवरून घेवून जात असताना मिळुन आला.

सदरचा माल त्याने गणेश काकडे (रा. सावता मंदिरा जवळ रांजनगांव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून विकत आणला असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातून मुद्देमाल व मोटार सायकल असा ५३,५६५ रुपयांचा माल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. पोउपनि आयुब पठाण यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करून पुढील तपास पो. नि. व्हि.एम. सलगरकर करीत आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त परिमंडळ- १ दीपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय गित्ते, पोलीस उपनिरीक्षक आयुब पठाण, पोना संजय दांडगे, पोअं बंडु गोरे, सुनील घुसिंगे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!