महाराष्ट्र
Trending

मुख्याध्यापक ४० हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकला, जिल्हा परिषदेस प्रस्ताव पाठवण्यासाठी हप्त्या हप्त्याने मागितली लाच !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – जिल्हा परिषदेस प्रस्ताव पाठवण्यासाठी हप्त्या हप्त्याने लाच मागितल्याचा निर्लज्ज प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आला आहे. मुख्याध्यापकाला ४० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याने ६०,००० /- रू. लाचेची मागणी केली होती. सापळा कार्यवाही दरम्यान ४०,००० /- (पहिला हप्ता) लाचेची रक्कम स्वीकारताना तो अलगद जाळ्यात अडकला.

भगवान नारायण लहाने (मुख्याध्यापक, श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय, पूर्णा सहकारी साखरखाना ता. वसमत जि. हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे.

दिनांक ११.०५.२०२३ रोजी यातील तकारदार यांनी तक्रार दिली होती की, तक्रारदार हे शिवाजी माध्यमिक विद्यालय, पूर्णा सहकारी साखरखाना (ता. वसमत जि. हिंगोली) या शाळेत अनुकंपा तत्वावर शिपाई या पदावर तीन वर्षे मानधनावर दि. ०१.११.२०२२ रोजी रूजू झाले. तक्रारदार यांचे शालार्थ प्रणाली मध्ये नाव समावष्ठि करण्यासाठी प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे पाठविण्याकरीता मुख्याध्यापक भगवान नारायण लहाने यांनी पंचासमक्ष ६०,००० /- रुपये लाचेची मागणी केल्याची तकार दिली होती.

त्यानंतर तक्रादार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता मुख्याध्यापक भगवान नारायण लहाने यांनी पंचासमक्ष ६०,०००/- रुपये लाचेची मागणी करून ४००००/- रू. (पहिला हप्ता) स्वीकारण्यास सहमती दिल्याचे निष्पन्न झाल्याने दि. ११.०५.२०२३ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष मुख्याध्यापक भगवान नारायण लहाने यांनी ४००००/- रुपये (पहिला हप्ता) लाच रक्कम स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले.

त्यावरून मुख्याध्यापक भगवान नारायण लहाने श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय, पूर्णा सहकारी साखरखाना ता. वसमत जि. हिंगोली यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

ही कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नांदेड, पोलीस उप अधीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल अंकुशकर, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली यांनी विजय पवार, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली, पोहेकॉ तान्हाजी मुंढे, ज्ञानेश्वर पंचलींग, रविंद्र वरणे, गजानन पवार, भगवान मंडलीक, पोना गोविंद शिंदे, पोशि राजाराम फुपाटे, शिवाजी वाघ, चापोना शेख मन्नान अॅन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली यांच्या मदतीने पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!