छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

कॅनॉट प्लेसमध्ये गाडी पार्क करताय जरा थांबा…गाडी लावताच मिळणार पावती ! पार्किंग धोरण लागू करण्याचे आदेश !!

प्रशासकांनी सोडवली कॅनॉट मधली पार्किंग समस्या

Story Highlights
  • एका तासानंतर पार्किंग शुल्क लागू होणार

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – कॅनॉट प्लेसमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढत मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शुक्रवारी तातडीने व्यापारी संघटनेची बैठक लावून कॅनॉटमध्ये पार्किंग धोरण लागू करण्याचे आदेश दिले.

शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तर होतेच सोबतच पादचाऱ्यांना पायी चालण्यासाठी त्रास होते. यामुळे स्थानिक व्यापारावर आणि पर्यटनावर नकारात्मक परिणाम होतो.

ही समस्या सोडवण्यासाठी मनपा आणि स्मार्ट सिटी तर्फे तयार करण्यात आलेल्या पार्किंग धोरण तयार करण्यात आले होते. यानुसार मनपाद्वारे कॅनॉट भागात स्थानिक स्टार्ट अप तर्फे डिजिटल प्रक्रिया द्वारे पेड पार्किंग सुरू करण्यात आले होते. याबद्दल व्यापाऱ्यांनी काही आक्षेप घेतले होते. याबद्दल प्रशासकांनी शुक्रवारी तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए बी देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, पार्किंग कंत्राटदार व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व व्यापारी, अधिकारी व कंत्राटदार सोबत चर्चा करून मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आदेशित केले की पार्किंग धोरण राबवणे खूप गरजेचे आहे आणि यासाठी गाडी दुकाना समोर लागताच चालकाला पावती दिली जाईल. त्यानंतर प्रत्येक तासाने टू व्हिलरसाठी 10 रू आणि फोर व्हिलर साठी 30रू ह्या प्रमाणे पार्किंग शुल्क आकारले जाईल.

प्रशासकांनी सांगितले की पार्किंग धोरण राबवण्याचे मूळ उद्देश शिस्त लावणे आहे. या निर्णयावर व्यापाऱ्यांनी सहमती आणि मनपाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

Back to top button
error: Content is protected !!