पैठण
Trending

पैठण व आपेगांव येथील विकास कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

- पालकमंत्री संदिपान भूमरे

 औरंगाबाद दि 13 : श्री क्षेत्र पैठण व आपेगांव येथे अनेक भाविक भेट देतात. पैठण व आपेगाव येथील विकास प्राधीकरणांतर्गत सुरू असलेली विकास कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले.

पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण व आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत मंजुर आराखड्यातील विकास कामांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, आमदार प्रदीप जैस्वाल, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे तसेच संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांना सादरीकरणाव्दारे विकास कामांची माहिती देण्यात आली.

पालकमंत्री म्हणाले पैठण येथील नाथ मंदिरातील विद्युत रोषणाईचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे तसेच मंदिरा शेजारी असणारे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. आपेगांव येथील घाटाचे काम लवकर पूर्ण करावे. या प्राधिकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!