छत्रपती संभाजीनगर
Trending

सातारा परिसरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या ! सिग्मा हॉस्पिटल परिसरातील नाल्याच्या काटेरी झुडपातून पळून जाताना पोलिसांनी झडप घालून केले जेरबंद !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार व रेकॉर्ड वरील सराईत आरोपी जेरबंद करण्यात आला. सिग्मा हॉस्पिटल परिसरात असलेल्या नाल्याच्या काटेरी झुडपातून पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी झडप घालून त्यास पकडले. जवाहरनगर डायल 112 बिट मार्शल यांनी ही कारवाई केली. सातारा परिसरात चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासह त्याच्यावर ४ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

विशाल रमेश कसबे (वय 22 रा. पुंजाबाई चौक, ग.नं- 05, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर डायल 112 बिट मार्शल दिनांक- 22/05/2023 रोजी डी-मार्ट दर्गा चौक येथील सोमवार आठवडी बाजार असल्याने त्याभागात पेट्रोलींग करित होते. गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मोटर सायकल चोरीच्या व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी हा आठवडी बाजारात येणार आहे. सदर माहीती मिळताच पोलिस पथक आरोपीस ताब्यात घेण्याकरिता रवाना झाले.

पोउपनि वसंत शेळके, पोह/ चंद्रकांत पोटे, पोअं/ मारोती गोरे यांच्या पथकाने डी-मार्ट बाजुला असलेल्या आठवडी बाजाराच्या समोरील रस्त्यावर सापळा लावला. थोड्या वेळाने गोपनीय बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनातील संशयित युवक शंभुनगरकडून आठवडी बाजाराकडे येत असतांना दिसला. पथकातील पोलिसांनी एकमेकांना इशारा केला.

दरम्यान, आरोपीस संशय आल्याने तो सिग्मा हॉस्पिटलच्या बाजुस असलेल्या वाहत्या नाल्याच्या काटेरी झुडपातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करुन 14.50 वाजेच्या सुमारास फरार आरोपीस ताब्यात घेतले. त्यास पोलिस स्टेशनला आणून विचारपुस केली. त्याने त्याचे नाव विशाल रमेश कसबे (वय 22 रा. पुंजाबाई चौक, ग.नं- 05, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने माहे एप्रिल/2023 च्या पहिल्या आठवड्यात त्रिशरण चौका जवळच्या भागातून एक एच. एफ. डिलक्स मोटर सायकल मित्र 1) रितेश दोडवे, (02) शेख आदिल यांच्यासोबत चोरी केल्याचे सांगितले. यासंदर्भात पोस्टे जवाहरनगर येथे गुन्हा दाखल आहे. त्या मोटर सायकलवर तिघांनी सातारा परिसर भागात एका जणास लुटून त्याच्या खिशातील चार हजार रुपये, मोबाईल, चाकूचा धाक दाखवून लुटले होते. या संदर्भात पोस्टे सातारा येथे गुन्हा दाखल आहे. या आरोपीवर यापूर्वी जबरीचोरी (2), व मोटर सायकल चोरी (01) यासह एकूण 04 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – 02, शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पो. आयुक्त बालाजी सोनट्टके, उस्मानपुरा विभाग, वरिष्ट पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि वंसत शेळके, डायल 112 बिट मार्शल पोह चंद्रकांत पोटे, पोअ मारोती गोरे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!