छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

भाची चुलत भावासोबत पळून गेल्याच्या रागातून चाकू हल्ला ! टेम्पो गल्लीत पार्क केल्यानंतर चढवला हल्ला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – चारचाकी टेंपो गल्लीत पार्क करत असताना आरोपींनी हल्ला चढवल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. दोघांमध्ये पूर्वीपासून वैमनस्य होते व भाची चुलत भावासोबत पळून गेल्याने हा वाद उफाळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना दि. २८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गारखेडा, हनुमान नगर परिसरात घडली.

1) शेख रऊफ शेख याकुब 2) शेख इम्रान शेख याकुब 3) महिला 4) आसीफ पटेल 5) याकुब शेख कालु शेख 6) व इतर दोघे (रा. गारखेडा, हनुमान नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यासदंर्भात आदिल शेख ताहिर शेख याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार यातील फिर्यादी व त्यांचा साथीदार बाबा शेख महंमद शेख असे मिळून चारचाकी टेंपो गल्लीत पार्क करत होते. आरोपी क्र. 1 शेख रऊफ शेख याकुब यांच्या घरासमोर काही वेळ उभा केला असता आरोपी क्र. 3 यांनी त्यांना शिवीगाळ केली.

त्यावेळी आरोपी क्र. 1 शेख रऊफ शेख याकुब हा तेथे आला व त्याच्या हातातील चाकुने फिर्यादी आदिल शेख ताहिर शेख याला पोटावर, मानेवर तसेच उजव्या हाताच्या दंडावर चाकुने वार करून जखमी केले. तसेच आरोपीतांनी दोघांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. यातील आरोपी क्र. 1 व फिर्यादी यांची पूर्वीपासून दुश्मनी असून आरोपी क्र. 1 ची भाची फिर्यादी यांच्या चुलत भावासोबत पळून गेल्याने त्यांचा पूर्वीचा वाद आहे.

याप्रकरणी जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये गुरनं -145/2024 कलम 307,143,147,148,149, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामी सपोनि चंदन यांच्या कडे दिले.

Back to top button
error: Content is protected !!