महाराष्ट्र
Trending

औरंगजेबच्या पोस्टवरून कोल्हापुरात राडा, हिंदु संघटनांच्या बंदला हिंसक वळण ! जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांचे शांततेचे आवाहन !!

खबरदारीचा उपाय म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त, इंटरनेट सेवा बंद !

Story Highlights
  • सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका- पोलिसांचे आवाहन

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- व्हाट्सअपवर औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी हिंदु संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत सौम्य लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेऊ नका व सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज पोस्ट करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. हिंदू संघटनांच्या निदर्शनांदरम्यान परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना अॅक्शन मोडवर यावे लागले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीमार केला. त्याचवेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका समुदायाच्या लोकांनी सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये औरंगजेबच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती यास हिंदु संघटनांनी तीव्र निषेध केला व आज आंदोलन सुरु होते. यावेळी हा प्रकार घडला.

औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्या सोशन मीडिया पोस्टच्या विरोधात मोठ्या संख्येने हिंदू संघटनांनी कोल्हापुरमधील लक्ष्मीपुरा पोलिस ठाण्यासमोर एकत्र येऊन निदर्शने केली. धार्मिक तेढ निर्माण करणार्यांना अटक करण्याची मागणी संघटनांनी केली. दरम्यान, दोन समुदायांमध्ये तणाव वाढण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनाने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

औरंगजेबाच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप पोस्टच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी आज, ७ जून रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान कोल्हापुरातील सर्वच चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Back to top button
error: Content is protected !!