छत्रपती संभाजीनगर
Trending

क्रांती चौक पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार लाचेच्या जाळ्यात ! चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व वरचेवर सोडून देण्यासाठी १२ हजार घेतले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या सहायक फौजदारांना १२ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व वरचेवर सोडून देण्यासाठी त्यांनी लाच घेतली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

फारूक गफुर देशमुख (वय 54 वर्ष, व्यवसाय नोकरी, पद- सहायक फौजदार ब नं 2326, पोलीस स्टेशन क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर शहर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांना पोलीस ठाणे क्रांती चौक येथे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व वरचेवर सोडून देण्यासाठी आरोपी सहायक फौजदार फारूक देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे दि. 05/10/2023 रोजी 15,000/- रुपयांची मागणी करून तडजोडी अंती आज दि. 06/10/2023 रोजी 12000/- रुपये स्वीकारले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – संतोष घोडके, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोलीस हवालदार रवींद्र काळे, पोलिस हवालदार पी. एन. पाठक पोलिस हवालदार साईनाथ तोडकर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!