छत्रपती संभाजीनगर
Trending

लासूर स्टेशनकडे निघालेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला लुटले ! गंगापूरचा व्यापारी औरंगाबादहून 27 लाख घेऊन निघाला, करोडीजवळ यू टर्नवर कारचा वेग मंदावला अन् घात झाला !!

करोडी गावाजवळील उडाणपुलावरून यू टर्न घेत असताना मोटारसाकलवरील दोघांनी लुटले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – गुजरातला विकलेल्या कापसाचे पैसे औरंगाबादहून लासूर स्टेशनकडे घेऊन निघालेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला २७ लाख ५० हजाराला लुटले. व्यापाऱ्याची कार करोडी गावाजवळील उडाणपुलावरून यू टर्न घेवून लासूर स्टेशनकडे जाणाऱ्या रोड कडे वळत असताना कारचा वेग कमी झाला आणि त्याचवेळी मोटारसायकल आडवी लाऊन दोघांनी त्यांना लुटले. 20 फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर हायवेवर ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मोटारसायकलवरील दोघा अज्ञात चोरट्यांनी साईनाथ मनोहर तायडे (५२, रा. देवळी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांची रक्कम कारमधून चोरली. साईनाथ मनोहर तायडे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते मागमील २० वर्षांपासून कापूस खरेदी व विक्रीचा व्यवसाय करत आहे. लासुर स्टेशन येथे शेतकऱ्यांकडून कापूस विकत घेवून तो विक्री करण्याचा व्यवसाय ते करतात. शेतकऱ्याकडून खरेदी केलेला कापूस साईनाथ मनोहर तायडे यांनी गुजरात राज्यातील कडी येथे विकलेला होता व त्या कापसाचे पैसे हे पि विजय यांच्याकडे गुजरात मधील व्यापाऱ्यांनी हवाला लावून दिले होते.

ते पैसे घेण्यासाठी साईनाथ मनोहर तायडे हे दि. 20/02/2023 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची कारने (क्रमांक MH 20 CS 3915) औरंगाबादकडे निघाले. त्यावेळी त्यांच्या सोबत कार चालक ज्ञानेश्वर भिवसन भुसारे हे होते. साईनाथ मनोहर तायडे हे सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गोमटेश मार्केट, औरंगाबाद येथील पि विजय यांच्या कार्यालयात पोहोचले. व्यापारातील त्यांच्याकडून कापसाच्या हावालातील रोख 27,50,000/- ( सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये) साईनाथ मनोहर तायडे यांनी त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगेत घेतले.

त्यात पंचवीस लाख रुपये हे पाचशे रुपये दराच्या नोटा होत्या व अडीच लाख रुपये हे शंभर रुपये दाराच्या नोटा होत्या. ही रक्कम बॅगेत ठेऊन त्यांनी त्यांच्या कारमध्ये मागील सिटवर ठेवली. साईनाथ मनोहर तायडे व कार चालक सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास लासुर स्टेशनकडे निघाले. ज्ञानेश्वर भिवसन भुसारे हा कार चालवत होता व त्याच्या शेजारी साईनाथ मनोहर तायडे बसले होते. तेथून पैठण गेट, बाब पेट्रोल पंप, नगर नाका, एस क्लब या मार्गाने सोलापूर धुळे महामार्गावरून ते जात होते.

रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची कार करोडी गावाजवळील उडाणपुलावरून यू टर्न घेवून लासूर स्टेशनकडे जाणाऱ्या रोड कडे वळत असताना कारचा वेग कमी झाला होता. अगदी त्याचवेळी त्याठिकाणी समोरुन एक लाल रंगाची मोटर सायकल आली. त्याने मोटर सायकल एकदम कार समोर आडवी लावली. त्यामुळे चालकाने कार थांबवली. तेवढ्यात पाठीमागून एक अनोळखी व्यक्ती हातात काठी घेवून आला. दरवाजा उघड, खाली उतर असे तो धमकावत होता. त्यामुळे साईनाथ मनोहर तायडे हे कारच्या खाली उतरले.

त्याच वेळी त्याने ड्रायव्हर समोरील काच त्याच्या जवळील काठीने फोडली. त्याने एक काठी साईनाथ मनोहर तायडे यांच्या उजव्या हातावर जोराने मारली. त्यावेळी कार चालकाने घाबरून कार आतून लॉक केली. त्यामुळे ते दोघे लॉक उघड म्हणून साईनाथ मनोहर तायडे यांना धमकी देत होते. भीतीपोटी त्यांनी चालकाला कारचे लॉक उघडण्याचे त्यांनी सांगितले. चालक ज्ञानेश्वरने लॉक उघडताच मागील सिटवर ठेवलेली बॅग काढून घेतली. बॅग घेवून ते दोघे कार समोर आडवी लावलेल्या मोटारसायकलने पुलाखाली. त्यानंतर साईनाथ मनोहर तायडे यांनी कारने काही अंतरावर त्यांचा पाठलाग केला.

परंतु कारची काच फुटलेली असल्याने चालकास कार वेगाने पळवता येत नव्हती व समोरील स्पष्ट दिसत नव्हते. चोरटे पुलाखालून नेमके कोणत्या दिशेने गेले हे साईनाथ मनोहर तायडे यांना दिसले नाही. याप्रकरणा व्यापारी साईनाथ मनोहर तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दौलताबाद पोलिस पुढील तपास करत आहे.

तरी आम्ही माझी कार क्रमांक MH 20 CS 3915 मध्ये कापसाचे व्यापाराचे 27,50,000/- रुपये बॅग मध्ये ती बॅग कारमध्ये ठेवुन औरंगाबाद येथुन लासुर स्टेशन कडे जात असतांना दि. 20/02/2023 रोजी रात्री 08.00 वाजे सुमारास धुळे सोलापुर हायवे वरिल करोडी गावाजवळील उडाणपुला वर • टर्न चे ठिकाणी मोटर सायकल वर येवुन मोटर सायकल कारचे समोर आडवी यु लावुन मला काठीने मारहाण करुन मला जखमी करुन कारच्या काचा फोडुन मला धमकावुन माझी रोख रक्कम असलेली बॅग दोन अनोळखी इसमाने घेवुन गेले आहे. त्यामुळे त्यांचे विरुध्द माझी

Back to top button
error: Content is protected !!