महाराष्ट्र
Trending

धोंडे जेवण पडले अडीच लाखांना, इरिगेशन खात्यातील पेन्शनरचे लातूरातील घर चोरट्यांनी केले साफ !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- धोंडे जेवणासाठी मुक्कामी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून तब्बल २ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना लातूर शहरातील विठ्ठलनगर भागातील ज्ञानयोग रेसिडेंन्सी अपार्टमेंट घडली.

सचिन बेलकुंडकर (रा. ज्ञानयोग रेसिडेंन्सी अपार्टमेंट, विठठल नगर लातूर) यांच्या घरी ही चोरी झाली. त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशन शिवाजी नगर, लातूर येथे दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांचे पती एरीगेशन खात्यामधून सेवानिवृत झाले आहे. सासू सासरे विवेकानंदपूरमं परीमल शाळेजवळ लातूर येथे राहण्यास आहेत.

दि. 25/07/2023 रोजी सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला, पती सचीन बेलकुंडकर व मुलगी राहत्या घराचे दार बंद करून कुलूप लावून धोंडे जेवणासाठी परिमल शाळेजवळील सासू- सासरे यांच्याकडे गेले होते. दि. 26/07/23रोजी सकाळी 11:45 वाजेच्या सुमारास पती पत्नी व मुलगी राहत असलेल्या ज्ञानयोग रेसीडेंन्सी अपार्टमेंट, विठठल नगर लातूर येथे दुस-या मजल्यावरील घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा उचकटलेला दिसला व दरवजा आर्धवट उघडा दिसला.

त्यांनी आत मध्ये जावून पहाणी केली असता घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून उघडलेला होता. कपाटातील सामान व कपडे आस्थाव्यस्थ पडलेले दिसले. कपाटातील दागिने अज्ञात चोराने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. एकूण 2,32,500/- रुपयांचे सोन्याचे दागिने चांदीचे भांडे अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!