महाराष्ट्र
Trending

आ. नारायण कुचेंच्या कार्यालयावर दगडफेक, बदनापूरला आंदोलक आक्रमक, हायवेवर टायर जाळले ! जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, १२५ जणांवर गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील मौजे अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज आक्रमक झाला असून त्याचे पडसात संपूर्ण राज्यात दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जालना हायवेवरील बदानापूर रोडवर जमावाने आंदोलन करून जुलमी राज्य सरकार आणि पोलिसांचा निषेध केला. हायवे रोडवर बदनापूर ते वरुडी फाटा दरम्यान ठिकठिकाणी आंदोलन केले. रस्ता रोको करून रस्त्यावर रोडच्या दोन्ही बाजुने टायर पेटवून रस्ता आडवून निषेध केला. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. याचदरम्यान जमावाने आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी जमावातील १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील २६ जणांना पोलिसांनी ओळखल्याचा दावा केला असून त्यांच्या नावानिशी गुन्हा दाखल केला आहे.

बदनापूर पोलिस स्टेशनचे पोना चरणसिंग रतनसिंग बम्हणावल यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि 01/09/2029 रोजी मौजे सराटी अंतरवाली (ता. अंबड पोस्टे गोंदी) अंर्तगत मराठा आरक्षण करीता सुरु असलेले उपोषण कर्ते यांनी पोलीसांवर दगडफेक केल्याने सदर परिस्थिति नियंत्रनात आणण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. सदर घटनेचा निषेध म्हणून व मराठा आरक्षण मिळावे म्हणून दिनांक 02/09/2023 रोजी मराठा समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर जालना हायवे रोडवर रस्ता रोको करून आंदोलक आंदोलन करणार होते. या बाबत गोपनीय माहीती मिळाली होती.

हायवे रोडवर 100 ते 150 आंदोलक –कायदा व सुस्थवस्था बदोबस्त कामी प्रॉपर बदनापूर, कृषी महाविद्यालय बदनापूर समोर, पाथ्रीकर कॉलेज बदनापूर समोर, सोमठाणा फाटा, वरुडी फाटा येथे पोनि यांच्या आदेशाने बंदोबस्त स्कीम प्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी 10,00 वाजता हजर होते. तेव्हा तेथे हायवे रोडवर 100 ते 150 आंदोलक रस्ता रोको करून रस्त्यावर रोडच्या दोन्ही बाजुने टायर पेटवून रस्ता आडवून निषेध करत होते.

जमावातील या २६ आंदोलकांवर गुन्हा – त्यानंतर अचानक 11.30 वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यानी बदनापूर पोलिस स्टेशनचे पोना चरणसिंग बम्हणावत यांच्या परिचयाचे 1) ऋषी थोरात 2 ) आकाश गणेश ज-हाड, (3) संकेत संतोष ज-हाड, 4) पदमाकर पडुळ 5) पवन वाघ रा. मानेवाडी, 6) राहुल आबदास काटकर, 7) ज्ञानेश्वर मच्छीद्र वाघ, ४) एकनाथ वाल्मीक हिवाळकर, 9) रवि कुमार बोचरे, 10) उदय काकडे रा. अकोला, 11) राधे उर्फ बाळु गणेश ज-हाड, 12) पंकज उतम ज-हाड,13) प्रसाद चव्हाण रा. नानेगाव, 14) विशाल धुराजी ज-हाड, 15)बी. टी. शिंदे, 16 ) परमेश्वर नाईकवाडे, 17 ) अंकुश नागवे, 18) वैजिनाथ मुरलीधर शिंदे. 19) किरण परमेश्वर नाईकवाडे, 20) काशीराम ज-हाड, 21 ) नंदु दाभाडे, 22) अफरोज बेग, 23) ज्ञानेश्वर मदन शिर्के, 24) रोहीत कोल्हे रा. धोपटेश्वर, 25) अभिषेक ज्ञानेश्वर ज-हाड 26) ओम ज-हाड व इतर अनोळखी 100 ते 125 आंदोलनकर्ते यांनी छत्रपती संभाजीनगरकडून जालनाकडे जाणा-या रोडवर आडवलेल्या वाहनांपैकी मार्केट कमिटी जवळील नौकार ट्रेडर्स दुकानासमोर उभी असलेल्या महाराष्ट्र शासन असे लिहिलेली टाटा सुमो वाहन क्र. एम. एच 27 ए. ए. 0530 या वाहनात बसलेल्यांना जबरदस्तीने खाली उतरवले.

आंदोलनकर्त्यानवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराचा वापर – गाडीवर दगडफेक व काठीने मारून नुकसान करण्यास सुरवात केली. तेव्हा अचानक जमलेल्या जमावपैकी दोघांनी सोबत आणलेल्या ज्वलनशील पदार्थ त्या सरकारी वाहणावर टाकू लागले तेव्हा पोलीसांनी त्यांना विरोध करून आडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीसांनवर दगडफेक केली. त्यानंतर सदरचे वाहन पेटवून दिले. आंदोलनकर्त्यानवर नियंत्रण मिळविण्यासाठी आश्रु धुराचा वापर केला. परंतु जमाव बेकाबू होवून पोलीसांवर दगडफेक करु लागले तेव्हा यात बंदोबस्तवर हजर असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार हे किरकोळ जखमी झाले.

तालुका दंडाधिकारी व पोलीस निरिक्षकाच्या आदेशाने बळाचा वापर- पोलिसांनी तालुका दंडाधिकारी व पोलीस निरिक्षक यांच्या आदेशाने जमावावर सौम्य बळाचा वापर केला. तेव्हा सदर ठिकाणावरुन जमाव तेथून निघून पुढे कृषी महाविद्यालय बदनापूर येथे जावून जमावाने पुन्हा रोडवर टायर लाकडे जाळून व काही ठिकाणी रोडवर मोठे दगड लावून व सिमेंटचे पाईप आडवे लावून वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्मान केला. पोलिसांनी तात्काळ तेथे पोहचले. तेथे उभ्या असलेल्या वाहनावर जामावाने दगडफेक केली. गाड्यांची तोडफोड करून येणारी जाणारी वाहतूक ठप्प केली. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून सौम्य बळाचा वापर केला.

जमावाची आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालयावर दगडफेक- दरम्यान, तेथे रोडच्या बाजुला असलेल्या बदनापूर- अंबड विधानसभेच आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालयावर दगडफेक करून नुकसान केले. त्यानंतर सोमठाणा फाटा व दुधनाफाटा येथे जमावाने टायर जाळून हायवे रोडवरील दोन्ही बाजुंकडील वाहतुक बंद केली. पोलीसांनी तेथे आश्रुधुर व सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवून रस्ता मोकळा केला.

बदनापूर पोलिस स्टेशनचे पोना चरणसिंग रतनसिंग बम्हणावल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!