संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ –सिकंदराबाद विभागातील लाईन ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणारी नांदेड-निझामाबाद-नांदेड एक्स्पेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
01. गाडी संख्या 07854 नांदेड ते निझामाबाद विशेष गाडी दिनांक 24 जुलै ते 30 जुलै 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
02. गाडी संख्या 07853 निझामाबाद ते नांदेड विशेष गाडी दिनांक 25 जुलै ते 31 जुलै 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेली गाडी :
01. गाडी क्रमांक 11409 दौंड ते निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 24 जुलै ते 30 जुलै, 2023 दरम्यान मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
02. गाडी क्रमांक 01413 निझामाबाद ते पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 25 जुलै ते 31 जुलै, 2023 दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe