टाईपिंगच्या परीक्षेत सावळा गोंधळ, दोन परीक्षार्थी पेपर घेऊन पळाले ! संस्थेच्या प्रतिनिधींनी सोडवला १६ जणांचा पेपर; सातारा, सिडको आणि बिडकीनच्या विद्यार्थ्यांची तोतयेगिरी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – शासकीय वाणिज्य परीक्षा (टंकलेखण)मध्ये सावळा गोंधळ समोर आला असून अनेक धक्कादाय बाबींमुळे प्रकरण पोलिसांत पोहोचले आहे. दोन परीक्षार्थी उत्तरपत्रीकेची पाने घेऊन पळून गेले तर चार परीक्षार्थी हे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांच्या भेटीच्या वेळी त्यांना ओळखपत्र न दाखवता परीक्षा हॉलमधून निघून गेले. याशिवाय चार टाईपिंग संस्थेच्या प्रतिनिधींनी १६ परीक्षार्थींचा पेपर सोडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिडकोतील वेणूताई चव्हाण हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याने परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जालम विठ्ठलराव चौरे (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हे शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यामिक चेलीपुरा हायस्कूल उस्मानपुरा येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यासंदर्भात शिक्षण विस्तार अधिकारी चौरे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 21/07/202323/07/2023 रोजी वेणूताई चव्हाण हायस्कूल N-8सिडको येथे शासकीय वाणिज्य परीक्षा (टंकलेखण) असल्याने चौरे यांची केंद्र संचालक म्हणून नेमणुक करण्यात आली होती.
दि 21/07/2023 रोजी 11:30ते 12:45 वाजेपर्यंत हॉल क्रमांक १ व २ मध्ये पर्यवेक्षक म्हणून एस. बी. कोकणी व एस.डी. दाभाडे यांची ड्यूटी होती. शासकीय वाणिज्य परीक्षा (टंकलेखन) सुरु असतांना 11:45वाजेच्या सुमारास अध्यक्ष शासकीय परीक्षा परीषद पुणे यांनी त्याच्या पथकासह परीक्षा केंद्राला भेट दिली. भवानी टाईपिंग राईटींग इन्स्टिट्यूट देवळाई सातार, मंजुषा टाईपिंग इन्स्टिट्यूट एन ११, सुयोग टाईपिंग बिडकीन या संस्थेचे परीक्षार्थी हे परीक्षा देत होते.
दरम्यान, एक परीक्षार्थी उत्तरपत्रीकेची 3 पुष्ठे घेवून पळून गेला. अन्य एक परीक्षार्थी उत्तरपत्रीकेचे अ.क्र. 4 पुष्ठे घेवून पळून गेला. याशिवाय ४ विद्यार्थी परीक्षा सुरु झाल्याबरोबर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांच्या भेटीच्या वेळी त्याना ओळखपत्र न दाखवता परीक्षा हॉल मधून निघून गेले. याशिवाय चार जण हे टाईपिंग संस्थेचे प्रतिनिधी असावे असे वाटते. सदरची परीक्षा हे प्रात्यक्षिक स्वरुपात टंकलेखन यंत्रावर घेतली जाते. त्यावेळी परीक्षेसाठी संबंधित संस्था चालकाचे यंत्र वापरली जातात.
परीक्षा दरम्यान टंकलेखन संस्थेचा प्रतिनिधी टंकलेखन यंत्रात बिघाड झाल्यास दुरुस्ती साठी ठेवला जातो परंतु संस्थाचालक व त्यांचे प्रतिनिधी यांनी स्वतः 16 विद्यार्थीचे पेपर टंकलेखीत केल्याचा संशय आहे. शासकीय वाणिज्य परीक्षा (टंकलेखण) परिक्षाच्या पेपरमध्ये एकूण २० जणांनी तोतयेगिरी करून ठकवणुक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी जालम विठ्ठलराव चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० जणांवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe