राजकारण
Trending

ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर अजितदादांचा गट अ‍ॅक्शन मोडवर ! नेत्यांवर दिली जिल्हानिहाय ही जबाबदारी !!

पक्षसंघटना वाढीकरीता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मंत्र्यांवर दिली जबाबदारी

मुंबई दि. १८  – राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील पहिली जाहीर सभा बीडमध्ये कालच घेऊन शक्तीप्रदर्शन केले. शरद पवारांच्या कालच्या या शक्तीप्रदर्शनानंतर अजितदादा पवार गटही अ‍ॅक्शन मोडवर आला असून दादाच्या गटाने आता मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी देऊन संघटन बांधणीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर, दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा,

हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर, धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!