महाराष्ट्रराजकारण
Trending

राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर एक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा !

नागपूर, दि. २० –  सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजपा पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे दणदणीत यश मिळविल्याबद्दल आज त्यांचा सत्कार केला आणि भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा केला. अजून सुमारे 700 जागांचे निकाल यायचे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला 842 जागांवर यश मिळाले असून भाजपा आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्ष मिळून 3190 जागांवर दणदणीत यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेही अभिनंदन केले.

ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी परिणाम काय असेल, हेच या निकालांनी दाखवून दिले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!