छत्रपती संभाजीनगरझेडपी
Trending

आशा व गट प्रवर्तकांना २६ हजार पगार देऊन आरोग्य विभागात कायम दर्जा द्या ! आंदोलनाने मिनी मंत्रालय दणाणले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – आशा व गट प्रर्वतकांना २६ हजार पगार देऊन आरोग्य विभागात कायम कर्मचार्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. कोविड काळात जिवाची बाजी लाऊन प्रामाणिक कर्तव्य निभावणार्या आशा व गट प्रवर्तकांचा राज्य सरकारला आता विसर पडला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विविध घोषणांनी  मिनी मंत्रालय दणाणून सोडले.

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सीईओ आणि महानगरपालिकेचे मुख्य प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात म्हटल आहे की, आशा व गट प्रर्वतक यांच्या कन्वेशनची दि.०७ ऑक्टोंबर २०२२ रोजी बैठक झाली. या बैठकीमध्ये १० डिसेंबर रोजी आशा व गट प्रर्वतक यांचा मागणी दिवस साजरा करण्याची हाक दिली आहे. कोवीड- १९ काळात आशा व गट प्रर्वतक यांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यांचा मागण्यांसाठी सतत निदेर्शने, मोर्चे, धरणे आंदोलने केली परंतु केंद्र शासन व राज्य शासनाचे धोरण आशा व गट प्रर्वतकाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अत्यंत अल्प मानधनावर आशा व गट प्रर्वतक यांना काम करावे लागते. कोणत्याही सामाजीक सुविधा मिळत नाही.

या आहेत प्रमुख मागण्या :-

१) आशा व गट प्रर्वतक यांना आरोग्य विभागात कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.
२) सर्व आशा व गट प्रर्वतक यांना किमान वेतन २६००० रुपये द्या.
३) तालुका पातळीवर समूह संघटक, एम.पी.डब्ल्यु. यांची मनमानी त्वरीत थांबवा.

४) आशा व गट प्रर्वतक यांना माणुसकीची वागणूक देऊन त्याचे मानधन ५ तारखेला द्या.
५) ज्या कामासाठी आशांना मोबदला मिळतो त्या कामाच्या रिपोर्टिंगसाठी गट प्रर्वतकाना मोबदला द्या.
६) विना मोबदला कोणतेही कामे आशांना सांगू नये. उदा. आभा कार्ड काढणे व हेल्थ कार्ड काढणे या कामाची सक्ती करू नये.

७) आरोग्य वर्धिनीचा मोबदला वार्षीक १२००० वाटप करा.
८) जे.एस.वाय. साठीच्या बीपीएल आणि एपीएल च्या अटी रद्द करा.
९) आशा व गट प्रर्वतक यांना मासीक मिटींगसाठी बस सवलत (पासेस) द्या.

१०) गट प्रर्वतक यांची महानगरपालिकेत त्वरित भरती करा.
११) एल.सी.डी. व एचबीवायसीची ट्रेनिंग त्वरित देण्यात यावी.
१२) आशा व गट प्रर्वतक यांना ड्रेसचा धुलाई भत्ता देण्यात यावा.
१३) विना मोबदला कुठलाही सर्वे करून घेऊ नये.

निवेदनावर कॉ. दामोदर मानकापे, कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. पुष्पा पैठणे, कॉ. ज्योती भोसले, कॉ. पुष्पा शिरसाठ, कॉ. वैशाली शिंदे, भाग्यश्री सोनवणे, फुरखाना फातेमा, जनाबाई नेटके, पुष्पा काळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Back to top button
error: Content is protected !!