छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरमध्येही काम बंद ठेवून बाजार समितीवर आंदोलन ! सत्ताधारी वाचाळांवर कारवाई करण्यासाठी हमाल कष्टकऱ्यांची निदर्शने !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – सत्ताधारी आमदार व राज्यपालांनी महामानवांची बदनामी व अपमान केल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे १३ डिसेंबर रोजी हमाल कष्टकरी यांनी काम बंद करून निदर्शने केली. शांततेच्या मार्गाने बाजार समितीवर निदर्शने करण्यात आली. साथी सुभाष लोमटे ( सरचिटणीस) महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, पुणे, कॅम्प: औरंगाबाद व  अॅड. सुभाष सावंगीकर ( सरचिटणीस), मराठवाडा लेबर युनियन यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात आले.

यासंदर्भात शासनाच्या प्रतिनिधीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्यांच्या मुळे बहुजन वर्ग व सर्व जाती-धर्मातील कष्टकरी , दलित – आदिवासी, भटके विमुक्त व महिला यांना शिक्षणाची व्दारे खुली होवून, आत्मसन्मान आणि सामाजिक न्याय व सुरक्षेचे मार्ग खुले झाले, अशा महा- पुरुषांची बदनामी आणि अपमान करण्याची शृंखला राज्यातील सत्ताधारी वर्गातील कांहीं मूठभर मंडळींनी जाणिवपूर्वक सुरू ठेवली आहे. अशी बदनामी व अपमान करण्यात राज्याचे राज्यपाल व मंत्री, आमदार आघाडीवर दिसत आहेत.

सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांकडून, महापुरुषांची अशी बदनामी होणे, हा राज्यातील जनतेचा घोर अपमान असून, तो महाराष्ट्रावरील कलंक आहे असे आम्ही समजतो. आमच्या महापुरुषांची, कोणत्याही प्रकाची बदनामी व अपमान आम्ही कदापीही खपवून घेणार नाही , हे आधी स्पष्टपणे सांगू इच्छितो आहोत.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

अंगमेहती कष्टकऱ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पुण्यात बैठक होवून दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी, महापुरुषांचे अशा बदनामीच्या विरुद्ध सर्व कामकाज बंद ठेवून पुणे बंदची हाक दिली होती. डॉ. बाबा आढाव यांच्या हाकेला प्रतिसाद देत, छत्रपती संभाजीनगरमध्येही हमाल कष्टकरी काम बंद ठेवून बाजार समितीवर, निदर्शने केली.

मुख्यमंत्री महोदय, आपण बहुजन समाजातून आल्याचे आम्ही वाचतो, आपणास महापुरुषांची बदनामी व अपमान, तोही आपल्या सहकाऱ्यांनी केलेला मान्य आहे…? आपण बदनामीच्या प्रत्येक प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. चौकशी आपण जर केली नाही तर, महापुरुषांचे बदनामी पेक्षा सत्तेची खुर्ची महत्त्वाची, असा संदेश जनमानसांत जाईल, हे मात्र निश्चित.

अत्त्योच्य पदावर बसलेले सत्ताधारी, कोणताही विधिनिषेध न बाळगता, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा व क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, लोकराजा शाहू महाराज, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पद्मभूषण विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविरुद्ध गरळ ओकतात. आम्ही अशा प्रत्येक कृतिचा लोकशाही पद्धतीने जाहीर निषेध करण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!