महाराष्ट्र
Trending

बीडच्या निधी अर्बन बँकेच्या मॅनेजरची २० लाखांची फसवणूक ! नाशिकमधील नोटांच्या छापखान्यात लिंक असून २० लाखांत १ कोटी देण्याची मारली थाप !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – मोबाईलवर बोलून विश्वास संपादन केला. वीस लाख रूपयाच्या बदल्यात एक कोटी रुपये देतो असे सांगून त्याने व त्याच्या सोबत असलेल्या सॅम्पल व पैश्याची बॅग देण्यासाठी आलेल्या अनोळखी व्यक्तिने संगणमत हा गंडा घातला. वीस लाख रूपये घेऊन त्या बदल्यात एक कोटी रुपये आहे असे भासवून पॅकिंग केलेल्या कोर्या वह्यांच्या पानांचे पॅकिंग केलेले बंडल देऊन फसवणूक केली. आपली नाशिकच्या नोटा छापखान्यात लिंक आहे. तुम्हाला २० लाखांत १ कोटीच्या नोटा देतो अशी थाप मारून व सुरुवातीला सॅम्पलमध्ये खऱ्या नोटा देऊन फसवणूक केली.

गोरख आसाराम भटे (रा. बाभळवाडी ह.मु.स्वराज्यनगर बीड) असे फसवणूक झालेल्या निधी अर्बन बँकेच्या मॅनेजरचे नाव आहे. फसवणुकीसंदर्भात भटे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालावरून (पोलिसांना सांगितलेली हकीकत अशी की), बीड मधील एका निधी अर्बन बँकेमध्ये मॅनेजर म्हणुन ते काम करतात. दिनाकं 14.6.2023 रोजी सध्यांकाळी 07.01 वाजता मला मोबाईल नंबरवर फोन आला व मी महालक्ष्मी आर्बन तुळजापूर येथुन बोलत आहे. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. मी फंन्डींगचे काम करतो. RBIचे कॅश क्रेडीट करतो. RBIचे फन्डींग नोट करन्सी मध्ये एक्स्ट्रा छापलेले पेमेन्ट सप्लाय करतो. नाशिक येथील नोटा छापन्याच्या कारखान्यात माझा मावस भाऊ आहे. त्या मार्फत माझी लिकं आहे. तेथून मला एक कोटी दिल्यावर चार कोटी पेमेन्ट देतात व तेच पेमेन्ट मी निधी बँकेला एक कोटीला तीन कोटी प्रमाणे देतो. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून बोलतो.

मी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने जितीन पाटील असे सांगितले व नोटा ख-या खोट्या पाहिच्या असलीत तर मी सॅम्पल म्हणून काही नोटा देतो. त्या नोटा तुम्ही बँकेत भरून बघा तुम्हाला नोटा ख-या आहेत याची खात्री पटल्यानंतरच आपण पुढील व्यवहार करू असे म्हणून त्याने फोन ठेवला. परत दुस-या दिवशी दिनांक 15/06/2023रोजी सकाळी 11.00 वाजता त्या व्यक्तीचा फोन आला व म्हणाला तुम्ही भेटण्यासाठी कोठे येता मी तुळजापूर वरून निघतो. तुम्ही बीड वरून निघा अर्ध्या रस्त्यात आपण भेटू. मला त्याची खात्री होत नसल्यामुळे मी त्याला भेटण्यासाठी गेलो नाही. त्याच दिवशी दिनांक 15.06.2023 रोजी परत त्याचा कॉल आला. तो म्हणाला माझी माणसे केजला पेमेन्ट देण्यासाठी आलेली आहेत. गाडी केजला चालली आहे. तर तुम्ही मांजरसुबा येथे या. तुम्हाला ते माणसे सॅम्पल पेमेन्ट देतील असे तो म्हणाला.

माझा त्याच्यावर विश्वास बसत नसल्यामुळे मी तिकडे गेलो नाही. त्या नंतर पुन्हा एक तासाने त्यांने फोन केला व सांगितले गाडी तुमच्या सिटीच्या बाहेर बार्शिनाका येथे येईल. त्या ठिकाणी माझा माणूस तुम्हाला देण्यासाठी सॅम्पल नोटा घेवून आलेला आहे. त्याच्या कडील नोटा घेवून जा असे तो म्हणाला मग मी खात्री करून बघण्यासाठी बार्शिनाका येथे मित्रासह मोटरसायकलवर गेलो. तेथे गेल्यावर त्या व्यक्तीने मला कॉल केला तर त्यांने एक व्यक्ती मी थांबलेल्या ठिकाणी गणपती मंदिरासमोर बार्शी नाका बीड येथे पाठविला. त्या माणसाने त्याच्या कडील बंद पॉकेट माझ्या हातात दिले व न बोलता तेथून सरळ निघुन गेला. ते पाकीट घेतल्या नंतर मी फोडून पाहीले त्या मध्ये 500 रुपयांच्या तीन नोटा व 100 रुपयाच्या तीन नोटा होत्या. त्यांनतर त्याने मला कॉल केला आणि म्हणाला या नोटा आणि मार्केट नोटामध्ये काही फरक आहे का ? नोटा सेम ओरीजनल आसल्यामुळे काहीही फरक दिसत नाही असे मी त्याला म्हणालो.

त्यांनतर तो म्हणाला त्या नोटाला चुना लावून बघा नोट लाल कलरची होईल. त्या प्रामाणे मी त्या नोटाला चुना लावल्या नंतर ती नोट लाल रंगाची झाली. त्या नंतर तो म्हणाला तुमच्या जवळील नोटानां चुना लावून बघा नोट लाल होती का ? मी माझ्या जवळच्या नोटाला चुना लावला असता नोट काही लाल झाली नाही. त्यानंतर तो म्हणाला या नोटा छापातांना शेवटची प्रोसेस राहिलेली आहे .त्यामुळे या नोटा लाल होतात. तुम्हाला नोटा ओरीजनल आहेत याची खात्री करायची असेल तर तुम्ही या नोटा नॅशनल बँकेत भरून पहा. त्यानुसार मी 16/6/ 2023 रोजी माझ्या SBI वPNB बँके खात्यामध्ये 500रु दोन नोटा व 100रु दोन नोटा इतर पैसे भरताना त्यामध्ये मिक्स करून बँकेत भरून बघीतल्या. नोटा ओरीजनल आसल्याने बँक मध्ये भरुन घेतल्या मुळे माझी खात्री झाली.

त्यांनंतर 17/06/2023 रोजी त्यां व्यक्तीने फोन केला आणि म्हणला की आपला पुढील व्यवहार कधी करावयाचा ? असे विचारले त्या वेळी तो म्हणाला की एक कोटी साठी कमीत कमी तीस लाख रुपये जमा करावे लागलीत. तीस लाखांपेक्षा कमीचा व्यवहार मी करत नाही. त्या वेळी मी म्हणालो माझ्या कडे एवढे पेमेन्ट नाही. त्या वेळी तो म्हणाला की तुमच्या कडे किती पेमेन्ट जुळेल ते सांगा असे म्हणाल्यावर मी त्याला सांगितले दहा ते पंधरा लाख पर्यत मी जुळवु शकतो. त्यांने पहिल्या शॅम्पल दिलेल्या नोटा ओरिजनल असल्याची खात्री पटल्यानंतर मी पुढील व्यवहार करण्यासाठी मी पेमेन्ट जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात लागलो. घरचे कापसाचे साडेपाच लाख रूपये, एका जणाकडून साडेसातलाख रूपये, अन्य एकाकडून उसने दोन लाख रूपये असे मिळून पंधरा लाख रूपये जमा केले. त्यानंतर रविवारी दिनांक 18.06.2023रोजी सकाळी 11.18 वाजता त्याचा फोन आला व म्हणाला की तुमचे पेमेन्ट जुळवले का ? असे विचारले. त्यावेळेस मी त्याला म्हणालो पंधरा लाख रुपये माझ्याकडे जमा आहेत.

त्या वर तो म्हणाला आणखी पाच लाख बघा असे म्हणाल्यावर मी परत उसनवारी करून पाच लाख रुपये जमा केले. एकूण वीस लाख रुपये जमा करून एका बॅगेत भरले. त्यानंतर त्याचा काँल आला की मी लातूर वरुन येत आहे तुळजापुरला पोहचल्या वर फोन करतो. नंतर तुम्ही बीड वरून निघा. आपण आर्ध्या रस्त्यात भेटू असे म्हणाला. त्या नतंर मी चार वाजता काँल केला असता तो म्हणाला की, तुम्ही बीड वरून निघा. मी रस्त्याने भेटतो. त्या प्रमाणे मी स्कॉर्पिओ गाडी मध्ये पैशाची बॅग घेऊन निघालो. त्याचा फोन आला मी तुळजापूरहून निघालो आहे. तुम्ही कोठपर्यत आले आहात ? असे विचारले असता मी म्हणालो आम्ही उस्मानाबाद बायपास या ठिकाणी आलो आहोत. त्या वर तो म्हणाला तुम्ही तेथेच थांबा मी पोहचल्या नंतर फोन करतो. मी एका हॉटेल समोर थांबलो. संध्याकाळी 06.42 वाजता बोलने झाले. त्या वेळी तो म्हणाला आणखी पंधरा मिनिटे तेथे थांबा. मी त्या ठिकाणी पोहचतो.

त्यांनंतर त्याचा 07.05 वाजता फोन आला व म्हणाला उस्मानाबाद येथील बस स्टॅन्ड समोर येण्यास सांगितले. मी त्याला म्हणालो तुम्ही बायपास रोड वरील हॉटेल समोर या पंरतु त्यांने तिकडे येण्यास नकार दिला. तुम्ही बस सॅन्ट समोर येवून थांबा. त्या प्रमाने मी गाडी घेवून बस स्टॅन्ड समोर थांबलो. त्या वेळी त्याने फोन केला व म्हणाला बसस्टन्डच्या पुढे शिवाजी महाराज चौकातून युटर्न करून बीड मार्गाकडे या. त्याप्रमाणे युटर्न करून बीड मार्गाकडे जाणा-या रोडला बस सॅन्टड समोर थांबलो असता तो म्हणाला तुम्ही पुढे गेला आहात परत युटर्न करून मागे या. एका बॅनर समोर गाडी थाबंवा. माझा माणूस तेथे येईल. त्या प्रमाणे युटर्न करून त्यांने सांगितलेच्या ठिकाणी गाडी उभा केली. त्या वेळी त्याचा फोन आला तो म्हणाला मी तुमची गाडी बघीतली आहे.

मला तुम्हाला भेटाला वेळ नाही आपण नंतर भेटु मला येथे कोणीही पाहु शकते तेव्हा माझा माणुस पैशानी भरलेली एक कोटीची बॅग तुमच्या कडे घेवून आला आहे. तुमच्या गाडीची डाव्या साईडची काच खाली करा व दोन सेकांदत ती बॅग ठेवा व तुमच्या कडील वीस लाखांची बॅग त्याचेकडे देवून निघा असे तो म्हणाला. तेवढ्यात त्याचा एक माणूस बँग घेवून गाडी जवळ आला. त्या वेळी मी त्याला म्हणलो बॅग उघडा. मला एकदा पैशाची खात्री करून घेवू दे असे म्हणाल्यावर तो म्हणाला की इतका वेळ लावायचा नसतो बघायचे तर बघा बॅगला वरून चैन होती. त्याने ती चैन उघडली पण आतमध्ये पूर्ण पणे वरून चिकट टेपने पॅक केलेले दोन बंन्डल होते. त्यामध्ये काय आहे ते दिसत नव्हते. परंतु फोनवर बोलणारा व्यक्ती म्हणाला या पॅकींगमध्ये नोटाचे बंन्डल आहेत असे म्हणत त्याचा कॉल मला सुरु होता.

त्या वेळी बॅग घेऊन आलेल्या व्यक्तीने आता वेळे घालु नका. त्या माणसांने त्याच्या कडील बॅग गाडीचा दरवाजा उघडन्याचा आत काचातून आत टाकली. त्याची बॅग गाडीत ठेवली व गाडीतील बॅग घेवून निघून गेला. फोनवर बोलणारा व्यक्ती समोर आला नाही. मी तेथून निघून थोडे पुढे आलो. नंतर एका दुकानातून कटर घेतले व बँग मधील पॅकींग फोडली असता मध्ये को-या वह्याची पॅकींग केलेली दिसली. त्यावेळी आपली फसवणूक झाली हे माझ्या लक्षात येताच मी त्याला त्याच्या नंबरवर कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद येवू लागला. पैश्याची बॅग घेऊन जाणारा माणूसही तेथून निघून गेला होता. याप्रकरणी पेठ बीड पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!