छत्रपती संभाजीनगर
Trending

पोलिस भरती: 39 जागा, 5725 अर्ज, आज 500 जणांना बोलवले, यापैकी 208 उमेदवारांनी चाचणी दिली, यातील 167 उमेदवार पात्र ठरले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी यात जातीने लक्ष घातले असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटिव्हीच्या निगराणीत होत आहे. 39 जागांसाठी 5725 अर्ज आले असून आज 500 जणांना बोलवले होते. यापैकी 208 उमेदवारांनी चाचणी दिली असून यातील 167 उमेदवार पात्र ठरले आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण  यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती-2021 ची भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता व मैदानी चाचणीला आज दिनांक 02/01/2023 पासुन सुरुवात करण्यात आली आहे. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक हे स्वत: संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यत भरती मैदानी उपस्थित राहून उमेदवारांना समस्या उद्भवल्यास त्याचे जातीने निराकरण करत आहेत. पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण भरती प्रक्रिया ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येत आहे.

यामध्ये उमेदवार यांचे नोंदणी ही त्यांचे बायोमेट्रिक स्कॅन करून करण्यात येत असून उमेदवार यांचे चेस्ट क्रमांकावर बारकोड क्रमांक देण्यात येत आहे.  याच प्रमाणे संपूर्ण प्रक्रियेमध्ये RFID [ Radio-frequency identification]  प्रणालीचा वापर करण्यात येत असून ज्याचे साहय्याने  उमेदवारांचे 100 मीटर व 1600 मीटरचा अचुक वेळ नोदंविण्यात येत आहे. वेळनुसार अचुक गुणांकन केले जात असल्याने उमेदवारांचे क्षमतेप्रमाणे त्यास अचुक गुणप्राप्त होत आहेत. ज्यामुळे उमेदवारांना प्राप्त गुणांकामध्ये आक्षेप निर्माण होत नाही.

पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण  येथे पोलीस शिपाई यांची एकूण 39 पदे असून या करिता 5725 उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केली आहेत. आज दिनांक 02/01/2023 रोजी 500 उमेदवारांना चाचणी करिता बोलवण्यात आले होते. यापैकी 208 उमेदवार हे शैक्षणिक व शारिरीक चाचणी करिता उपस्थित राहिले. यामध्ये 167 उमेदवार हे पात्र झाले असून त्यांनी यशस्वीरित्या मैदानी चाचणी परीक्षा दिली आहे. तर 41 उमेदवार हे अपात्र ठरले आहे.

भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना अस्वस्थता वाटल्यास अगर जखमी झाल्यास त्यांना तात्काळ उपचारकामी डॉक्टर टिम व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे. तसेच  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणे करून उमेदवारांना कोणताही भरती प्रक्रियेमध्ये कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक यांनी उमेदवांरा आवाहन केले आहे की, उमेदवारांची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे होत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही अद्यावत तंत्रज्ञानाचे साहय्याने पार पडत आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येत असून भरती मैदानात सि.सी.टी.व्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्याही भुलथापाना / आमिषाला / प्रलोभनाला बळी पडू नये. कोणीही भरती करून देतो असे आश्वासन देत असल्यास तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!