महाराष्ट्र
Trending

बदनापूरजवळ खाजगी बसला भीषण अपघात, पुलावरून कोसळून २५ प्रवासी जखमी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – बदनापूरजवळ खासगी बसला भीषण अपघात होवून २५ प्रवासी जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटून ही बस पुलाखाली कोसळली. ही घटना मध्यरात्री बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी परिसरात घडली. या अपघातात चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

एम. एच.४०- सी. एम.६९६९ या क्रमाकांची खाजगी बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावरील बदनापूर नजीक मात्रेवाडी परिसरात बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस पुलाखाली कोसळली. हा अपघात मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व जखमींना रुग्णालयात दाखल केले.

शुभम हत्तीमारे (वय २७, रा. गोंदिया), अमन कुमार (वय १९, रा. मध्यप्रदेश), वर्षा नागरवाडे (वय ४०, रा. यवतमाळ), रवींद्र राजे (वय ३३), मोहम्मद सैफुद्दीन (वय ३० ), पराग शिंगणे (वय ४२, रा. नागपूर), निकेल मानिजे ( वय २३, रा. वर्धा), संभाजी सासणे (वय ३२, यवतमाळ), मधुकर पोहरे (वय ४०, रा. अमरावती), रितेश चंदेल (वय २३), गणेश भिसे (वय ३७, रा. यवतमाळ), शहाबज खान, सागर उपाय्या (वय १९, मध्य प्रदेश), अनिता इंगोले (वय ३५), किरण मांटुळे (वय ३८, रा. यवतमाळ) अशी जखमींची नावे आहे. या जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!