छत्रपती संभाजीनगर
Trending

क्रीडा विद्यापीठाच्या प्रस्तावित जमीनीतून अवैध मुरुम उपसा ! करोडी शिवारात चालायचा रात्रीस खेळ, सहा जणांवर गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – तालुक्यातील करोडी शिवारात प्रस्तावित क्रीडा विद्यापीठाच्या जमीनीतून अवैध मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतने केलेल्या तक्रारीवरून अप्पर तहसीलदारांनी पाठवलेल्या पत्रानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी स्थळ पंचनामा करून प्रकरण पोलिसांत दिले आहे.

1) मोफीन खान मकबुल खान पठाण, 2) बाबा खान मकबुल खान पठाण (रा. आसेगाव ता. गंगापूर), 3 ) बाळु भाऊसाहेब गोल्हार, 4) रवि रावसाहेब गोल्हार (रा. करोडी), 5) इस्माईल कोंदन सय्यद, 6) युसुफ शेख (रा. सहजापूर) यांच्यावर दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मंडळ अधिकारी अभिलाशा केशव म्हस्के (ने. मंडळ कार्यालय पंढरपूर ता जि छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दि. 24/05/2023 रोजी अपर तहसीलदार यांनी फिर्याद देण्यासंदर्भातील पाठवलेले पत्र प्राप्त झाले व त्यानुसार फिर्याद देत आहे. मौजे करोडी (ता. व जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गट क्रमांक 135 मधील एकूण क्षेत्रफळ 55 हेक्टर 79 आर पैकी क्षेत्रफळ 46 हेक्टर 60 आर जमीन क्रीडा विद्यापीठाकरिता प्रदान करण्यात आलेली आहे.

या जमीनीतून अवैध गौणखनिजाची चोरी होत असल्याबाबत ग्रामपंचायत करोडी यांनी दि. 08/05/2023 रोजी लेखी तक्रार केल्यावरून मंडळ अधिकारी व तलाठी सजा शरणापूर यांनी दि. 09/05/2023 रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने गट क्रमांक 135 मध्ये जाऊन जायमोक्यावर पंचनामा केलेला आहे. सदर स्थळ पहाणीमध्ये क्रीडा विद्यापीठा करिता प्रदान करण्यात आलेल्या जमीनीतून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक झाल्याचे सकृत दर्शनी निर्दशनास आले आहे.

स्थळपाहणी वेळी उपस्थितीत असलेल्या पंचाना विचारणा केली असता मागील दहा ते बारा वर्षांपासून जे.सी.बी व डंपरच्या साह्याने रोज रात्री 10 ते 15 अज्ञात वाहन धारकांनी सदर गटातून अवैध मुरुम उत्खनन करून वाहतूक करत असल्याबाबत सांगितले. एका गुप्त खबरीने दिलेल्या माहितीनुसार 1) मोफीन खान मकबुल खान पठाण, 2) बाबा खान मकबुल खान पठाण (रा. आसेगाव ता. गंगापूर), 3 ) बाळु भाऊसाहेब गोल्हार, 4) रवि रावसाहेब गोल्हार (रा. करोडी), 5) इस्माईल कोंदन सय्यद, 6) युसुफ शेख (रा. सहजापूर) यांनी मौजे करोडी येथील गट क्रमांक 135 मधून अवैध मुरुम उत्खनन अवैध वाहतुक केल्याचे सांगितले. सदरची चोरी ही मागील सुमारे 10 ते 12 वर्षांपासून झालेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!