महाराष्ट्र
Trending

प्रेमसंबंधातून जालन्यात खून, अंगणात झोपलेल्या अवस्थेत असतानाच डोक्यात वार करून काढला काटा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – प्रेमसंबंधातून जालन्यात खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अंगणात झोपलेल्या अवस्थेत असतानाच डोक्यात वार करून काटा काढला असून मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून महिला व साथिदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्देन झिने (वय 39 वर्षे, रा. सिरसवाडी रोड टि. व्ही. सेंटर जालना) असे मृताचे नाव आहे.

यासंदर्भात मृताच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दि. 06/05/2023 रोजी दुपारी 01.30 वाजेच्या सुमारास त्या व त्यांचे पती परमेश्वर उर्फ प्रमोद झिने जालना शहरात बाजारात जावून मुलांबाळासाठी कपडे व इतर घरउपयोगी सामान खरेदी करून संध्याकाळी 06.30 वाजेच्या सुमारास घरी परतले.

संध्याकाळी 07.30 वाजेच्या सुमारास घरी नातेवाईक आले. तेव्हा परमेश्वर उर्फ प्रमोद झिने व नातेवाईक गप्पा मारत बसले व थोड्या वेळाने रात्री 09.00 वाजेच्या सुमारास जेवन झाले. त्यानंतर पुन्हा गप्पा टप्पा झाल्या. नंतर नातेवाईक त्यांचे घरी दरेगाव येथे निघून गेले. रात्री 10.00 वाजेच्या सुमारास परमेश्वर उर्फ प्रमोद झिने हे नेहमी प्रमाणे घरा समोरील अंगाणामध्ये टाकलेल्या लोखंडी पलंगावर झोपले. त्यांची पत्नी व मुले घरामध्ये झोपले.

दि.07/05/2023 रोजी सकाळी 06.00 वाजेच्या सुमारास अंगणामध्ये पलंगावर झोपलेल्या परमेश्वर उर्फ प्रमोद झिने यांना उठविण्यासाठी त्यांची पत्नी जवळ गेली असता त्याठिकाणी रक्त पडलेले दिसले. तेव्हा पत्नीने कुटुंबातील सदस्यांना हा प्रकार सांगितला. परमेश्वर उर्फ प्रमोद झिने यांच्या डाव्या कानावर, जबड्यावर, डोक्यावर धारदार हत्याराने मोठी दुखापत केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला होता. यात परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्धन झिने यांचा मृत्यू झाला.

परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्देन झिने यांचे एका महिलेसोबत दीड ते दोन वर्षांपासुन प्रेम संबंध होते. त्यामुळे परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्देन झिने यांचे व त्यांच्या पत्नीमध्ये अधून मधून किरकोळ वाद होत होते. परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्देन झिने यांनी फोनवरुन त्या महिलेसोबत पत्नीचे बोलणे करून दिले होते. तसेच परमेश्वर उर्फ प्रमोद झिने यांचे बऱ्याच वेळा प्रेमसंबंधात अधूनमधून त्या महिलेसोबत वाद होत होते.

सदर महिला परमेश्वर यांना फोन वरुन शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होती. त्यामुळे परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्धन झिने यास दि. 06/05/2023 रोजी रात्री 10.00 ते दि.07/05/2023 रोजी सकाळी 06.00 वाजे दरम्यान घरसमोर अंगणात पलंगावर झोपलेले असताना सदर महिलेने व तिच्या इतर साथीदारांनी धारदार हत्याराने डाव्या कानावर, जबड्यावर व डोक्यात जबर वार करू ठार मारल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे.

याप्रकरणी मृत परमेश्वर उर्फ प्रमोद जनार्देन झिने यांच्या पत्नीने तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून महिला व तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!