छत्रपती संभाजीनगर
Trending

टेलरच्या दुकानात जुना शर्ट हातावर पडला म्हणून चक्क कोयत्याने वार केला ! फोन करून दोघांना बोलावले अन् रिक्षाचालकास बेदम मारले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- रिक्षाचालकाने पिशवीतून शर्टचा कापड काढून टेलरच्या हातात दिला व माप घेण्यासाठी आणलेला जुना शर्ट पिशवीतून काढून काऊंटरवर ठेवत असतांना तो शर्ट ओळखीच्या एका जणाच्या हातावर पडला. या क्षुल्लक कारणावरून वाद झाला अन् वादाचे पर्यावसन रॉड, दांडा आणि कोयत्याने हाणामारीत झाले. या घटनेत रिक्षाचालकासह त्याचा भाऊ असे दोघे जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. अक्षय नाना रगडे (वय 26 वर्षे, व्यवसाय- रिक्षाचालक रा. एन. 6 सिडको, संभाजी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.

रगडे यांच्यावर एम.जी.एम हॉस्पिटल अपघात विभागात उपचार सुरु आहेत. जखमी अक्षय नाना रगडे यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक 07/05/2023 रोजी रात्री 08.00 वाजेच्या सुमारास अक्षय नाना रगडे हे गल्लीत असलेल्या प्रितम टेलर दुकानात ड्रेस शिवायला टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुकानात लव राणा हा काऊंटरजवळ मोबाईल बघत होता. त्यावेळी अक्षय नाना रगडे यांनी त्यांच्या पिशवीतून शर्टचा कापड काढून टेलरच्या हातात दिला व माप घेण्यासाठी आणलेला जुना शर्ट पिशवीतून काढून काऊंटरवर ठेवत असतांना तो शर्ट लव राणा याच्या हातावर पडला.

यामुळे लव राणा हा अक्षय नाना रगडे यांना शिवीगाळ करु लागला. त्यानंतर त्याने त्याच्या भावाला फोन केला असता कुश राणा, सनी राणा हे दोघेही हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणी कोयता घेवून त्या ठिकाणी आले. सनी राणा याने त्याचा हातातील कोयत्याने अक्षय नाना रगडे यांच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच लव राणा याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने आणी कुश राणा याने त्याच्या हातातील लाकडी दांडा डोक्यात, हातावर आणी पाठीवर मारून अक्षय नाना रगडे यांना जखमी केले.

त्यानंतर अक्षय नाना रगडे यांचा भाऊ व आई हे त्याठिकाणी आले असता लव राणा, कुश राणा, सनी राणा यांनी तिघांनी अक्षय नाना रगडे यांच्या भावालाही मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर त्या ठिकाणी अक्षय नाना रगडे यांचा चुलत भाऊ हा आला व त्याने भांडण सोडवले व जखमी अक्षय नाना रगडे व त्यांच्या भावाला एम.जी.एम. हॉस्पिटल येथे दाखल केले.

याप्रकरणी जखमी रिक्षाचालक अक्षय नाना रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!