
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – ट्राफिक ब्लॉक मुळे नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आलेला आहे.
1) दिनांक 06 जानेवारीला नांदेड येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12751 नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हr गाडी न्यू दिल्ली, जाखल आणि धुरी या बदलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ही गाडी अंबाला, राजपुरा आणि पटियाला या रेल्वे स्थानकांवरून धावणार नाही.
2) दिनांक 20 जानेवारीला नांदेड येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12751 नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी पानिपत, जाखल, धुरी आणि लुधियाना या बदलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ही गाडी अंबाला, राजपुरा आणि पटियाला या रेल्वे स्थानकांवरून धावणार नाही.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
3) दिनांक 15 आणि 22 जानेवारी, 2023 ला जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12752 जम्मू तावी – नांदेड हमसफर एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, ही गाडी लुधियाना, धुरी, जाखल आणि पानिपत या बदलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ही गाडी पटियाला, राजपुरा आणि अंबाला या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही.